Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर बोलताना किरेन रिजिजू यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. आधीच बिथरलेल्या पाकिस्तानची किरेन रिजिजू यांच्या वक्त्यव्यानंतर झोप उडणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
किरेन रिजिजू म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. ते एक सतत चालणारे ऑपरेशन आहे." पुढे त्यांनी म्हटलं की, "भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडले आहे. सरकार याबद्दल अगदी स्पष्ट आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हेतू जगाला आधीच माहीत आहे. अशा परिस्थितीत आपण विभागले जाऊ नये अशी पंतप्रधानांची इच्छा आहे."
(नक्की वाचा: 'सुसाईड ड्रोन'ने उडवली पाकिस्तानची झोप! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये वापर)
ऑपरेशन सिंदूरनंतर आयोजित सर्वपक्षीय बैठक सर्व राजकीय पक्षांनी सरकार आणि भारतीय लष्कराला पाठिंबा दिला. सरकार जे पाऊल उचलेल आम्ही त्यांच्यासोबत असून, असं आश्वासन सर्व पक्षांनी दिलं. बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
संपूर्ण ऑपरेशन संवेदनशील- राजनाथ सिंह
राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली आहे. संपूर्ण ऑपरेशन संवेदनशील आहे, त्यामुळे काही संवेदनशील माहिती आता उघड करणे योग्य राहणार नाही. सध्या सर्व प्रकिया सुरु आहे. ऑपरेशन सिंदूर सुरुच आहे, त्यामुळे याबाबत आता सविस्तर सांगणे योग्य ठरणार नाही.
(नक्की वाचा : भारतीय लष्कराची पाकिस्तानवर कारवाई आणि चीनला इशारा! समजून घ्या अर्थ)
राहुल गांधींचा पाठिंबा
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीदेखील सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. सरकार सर्वांना विश्वासात घेत आहे ही चांगली गोष्ट आहे. आधीही विश्वासात घेतलं होतं. त्यामुळे आम्ही सरकारचं समर्थन करतो.