Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरच्या शौर्यगाथेचे धडे शाळा- कॉलेजच्या अभ्यासक्रमात; 'या' राज्यात मोठा निर्णय

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी:

Operation Sindoor:  पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरची कारवाई करत पाकिस्तानला धडा शिकवला. भारताने राबवलेल्या या ऑपरेशनमध्ये शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ऑपरेशन सिंदूरच्या या यशानंतर देशभरात जल्लोष केला जात आहे. अशातच आता भारतीय सैनिकांच्या या शौर्यगाथेचा धडाही शालेय पाठ्यपुस्तकात शिकवला जाणार आहे, ज्याचा पहिला निर्णय राजस्थानने घेतला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

 याबाबत सविस्तर माहिती अशी की,  राजस्थान सरकारने “ऑपरेशन सिंदूर” या भारतीय लष्कराच्या शौर्यगाथेला शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत आगामी शैक्षणिक सत्रापासून अभ्यासक्रमात बदल केला जाणार असून, या वीरगाथेला विशेष स्थान दिले जाणार आहे. यासाठी खास पुस्तक तयार करण्यात येणार असून त्याचे नाव “सिंदूर” असे ठेवले जाईल.

राजस्थानचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा यांनी सांगितले की, “येत्या काळात देशातील विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराच्या या अभूतपूर्व पराक्रमाची ओळख अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करून दिली जाईल.” ऑपरेशन सिंदूरला अभ्यासक्रमात सामाविष्ट करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(नक्की वाचा -  India vs Pakistan : भारताची पंगा घेऊन पाकिस्तानवर कर्ज घेऊनही भीक मागायची वेळ! किती झालं नुकसान?)

तसेच उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा म्हणाले की, "जुलैपासून सुरू होणाऱ्या नवीन अधिवेशनाची तयारी सुरू आहे. नवीन सत्रात अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचे कामही सुरू आहे, मग अशा परिस्थितीत ऑपरेशन सिंदूर कसे वगळता येईल. देशातील प्रत्येक नागरिकाला या ऑपरेशनबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आपल्या तरुण पिढीला याबद्दल सांगितले पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सध्या विभागीय तज्ज्ञ समितीसोबत चर्चा सुरू आहे. या संदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर'च्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सशस्त्र दलांचे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन करण्यात आले. पाकिस्तानविरोधात भारताने कडक पाऊल उचलले आणि सडेतोड प्रत्युत्तर दिले, या संपूर्ण कारवाईचं कौतुक करण्यात आलं आहे. दहशतवादविरोधात भारताची भूमिका ठाम असल्याचा संदेश यातून गेला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Video : 'पराभवानंतरही ढोल वाजवण्याची पाकिस्तानची जुनी खोड, POK रिकामं करा', भारतानं ठणकावलं )