Pehalgam Terror Attack: भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची भंबेरी, लष्करी युद्ध सरावाला सुरुवात

रणगाडे आणि इतर लष्करी साधनांची तैनाती करण्यात आली आहे. चीनकडून मिळवलेली SH-15 155 मिमी 52-कॅलिबर स्वयंचलित तोफही सरावात सहभागी झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pehalgam Terror Attack Updates:  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून शक्य असलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ (LoC) तसेच अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव सुरू केला आहे. या सरावाच्या दरम्यान पाकिस्तानने लाहोर आणि इस्लामाबाद दरम्यानचे काही हवाई मार्गही तात्पुरते बंद केले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पाकिस्तानने नौदलासाठी ‘Nav Area' इशारे जारी केले आहेत. हा सराव भारताकडून होऊ शकणाऱ्या कारवाईसाठी आधीच तयारी करून ठेवण्याच्या दृष्टीने असल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले आहे. पाकिस्तान एअर फोर्स (PAF) तीन वेगवेगळ्या भागांमध्ये सराव करत असून, यामध्ये नियंत्रण रेषेजवळ ‘Exercise Hammer Strike', दक्षिणी एअर कमांडद्वारे ‘Zarb-e-Haideri', उत्तरी एअर कमांडचे ‘Fiza-e-Badar' आणि सेंट्रल एअर कमांडचे ‘Lalkar-e-Momin' हे मोठे सराव सुरू आहेत.

या सरावात F-16, J-10 आणि JF-17 यांसारखी फायटर जेट्स सहभागी झाली आहेत. JF-17 या लढाऊ विमानांसोबत चीनकडून मिळवलेली PL-15 क्षेपणास्त्रेही वापरण्यात येत आहेत. पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात तोफखाना, रणगाडे आणि इतर लष्करी साधनांची तैनाती करण्यात आली आहे. चीनकडून मिळवलेली SH-15 155 मिमी 52-कॅलिबर स्वयंचलित तोफही सरावात सहभागी झाली आहे.

( नक्की वाचा : कोण आहेत PM मोदींचे 7 महारथी? जे लिहिणार पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी )

अरबी समुद्रात नौदल सराव

अरबी समुद्रातही पाकिस्तानी नौदलाने स्वतंत्र युद्धसराव सुरू केला आहे. यामध्ये मिसाइल आणि गन फायरींगचाही समावेश आहे. भारताकडूनही 30 एप्रिल ते 3 मेदरम्यान गुजरात किनाऱ्याजवळ नौदल सराव राबवण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून रोज नवे हवाई इशारे (NOTAMs) जारी करण्यात येत आहेत. भारत आणि पाकिस्तान दोघांनीही अरबी समुद्रातील भागात उड्डाणांबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Mumbai Indians : तळाची मुंबई इंडियन्स टॉपला कशी पोहोचली? वाचा विजयी सिक्सर्सचे 6 प्रमुख कारणं )