PM Kisan Yojana: PM किसान योजनेतून नाव गायब? 'हे' काम लगेच करा, तुमचे नाव कसे तपासाल? वाचा...

पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी सरकार राज्यांकडून आलेल्या माहितीची कसून तपासणी करते. जर तुमची माहिती अपूर्ण असेल किंवा त्यात काही चूक असेल, तर तुमचे नाव लाभार्थी यादीतून वगळले  जाऊ शकते. 

जाहिरात
Read Time: 3 mins

PM Kisan Yojana Update News:  देशातील  शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता  लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत म्हणून तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. यंदाच्या हप्त्याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे, कारण त्यांचा हप्ता मिळणाऱ्या लाभार्थ्यांच्या यादीतून नाव गायब झाले आहे. जर तुमच्या बाबतीतही असे झाले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

वृत्तांनुसार, केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता म्हणून २,००० रुपये ट्रान्सफर (Transfer) करू शकते. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. यावेळी देखील हप्त्याचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील.  परंतु, पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी सरकार राज्यांकडून आलेल्या माहितीची कसून तपासणी करते. जर तुमची माहिती अपूर्ण असेल किंवा त्यात काही चूक असेल, तर तुमचे नाव लाभार्थी यादीतून वगळले  जाऊ शकते. 

Akola News : अकोल्यात 'खाकी' ला डाग, थेट SP ऑफिसमध्येच लाच घेताना 'मॅडम' ना अटक

यादीतून नाव का वगळले जाते? 

  • ई-केवायसी अपूर्ण किंवा कालबाह्य  झाली असल्यास.
  • आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसणे.
  • नाव किंवा जमिनीच्या नोंदीमध्ये चुका असणे.
  • बँक तपशील किंवा कोड चुकीचा नोंदवला असल्यास.
  • शेतकऱ्याच्या नावावर जमिनीची मालकी  नसेल.
  • सरकार वेळोवेळी डेटाची पडताळणी करते आणि ज्या शेतकऱ्यांचे तपशील जुळत नाहीत, त्यांना लाभार्थी यादीतून वगळले जाते. 

यादीतील नाव कसे चेक कराल? 

नाव नसल्यास काय करावे?

  • ई-केवायसी पूर्ण करा: जर आधार कार्ड मोबाईलशी लिंक असेल, तर pmkisan.gov.in वर ओटीपीद्वारे ई-केवायसी करा. लिंक नसेल, तर जवळच्या सीएससी सेंटरमध्ये  जाऊन फिंगरप्रिंट किंवा फेस व्हेरिफिकेशनने प्रक्रिया पूर्ण करा.
  • आधार लिंकिंग तपासा: बँक आणि आधार लिंकिंग योग्य आहे का, हे तपासा. तसेच, नाव, जन्मतारीख आणि लिंग दोन्ही नोंदींमध्ये एकसारखे (Identical) असावे.
  • जमिनीच्या नोंदी दुरुस्त करा: जमीन नोंदीत काही चूक असल्यास, आपल्या महसूल विभाग  किंवा कृषी कार्यालयात जाऊन त्वरित सुधारणा करून घ्या।
  • पेमेंच अडकू शकते: जर पडताळणीच्या वेळी तुमचे तपशील अपूर्ण असतील, तर तुमचे पेमेंट अडकू शकते आणि तुम्हाला पुढील हप्त्यापर्यंत वाट पाहावी लागू शकते. शेतीचा खर्च भागवण्यासाठी हे २,००० रुपयांचे पेमेंट महत्त्वपूर्ण असल्याने, आताच काही मिनिटे काढून माहिती तपासा.