Population of India: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच भारताच्या लोकसंख्या वाढीवर आपले विचार मांडले. ते म्हणाले, “भारताचं लोकसंख्या धोरण 2.1 मुलांचं आहे. याचा अर्थ एका कुटुंबात तीन मुले असावीत. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने हे सुनिश्चित केलं पाहिजे की त्याच्या कुटुंबात तीन मुले असतील.” ही गोष्ट त्यांनी RSS च्या 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सांगितली. त्याचबरोबर त्यांनी असंही जोडलं की, 3 पेक्षा जास्त मुले नसावीत. कारण जास्त लोकसंख्या वाढ शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांसारख्या संसाधनांवर दबाव टाकते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांच्या या वक्तव्याने लोकांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. अखेर भारतात मुलांची संख्या कशी आहे? आपल्याला खरंच आणखी मुलांची गरज आहे की लोकसंख्या आधीच खूप जास्त आहे? चला तर मग, या महत्त्वाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष देऊया. आणि जाणून घेऊया की भारतात मुले जन्माला घालण्याच्या बाबतीत कोणते राज्य सर्वात पुढे आहे. शिवाय तीन मुलांना जन्माला घालणे सध्याच्या काळात शक्य आहे का? असं करण्यात कोणतं राज्य सर्वात पुढे आहे हे ही पाहुयात.
प्रजनन दरात (Fertility Rate) सर्वात पुढे कोणते राज्य आहे?
NFHS-5 (2019-21) च्या आकडेवारीनुसार, बिहार हे भारतातील सर्वात जास्त प्रजनन दर असलेलं राज्य आहे. बिहारचा प्रजनन दर 3.0 आहे. याचा अर्थ बिहारमधील एक महिला सरासरी 3 मुलांना जन्म देते. त्या पेक्षाही जास्त मुलं असल्याची उदाहरणं बिहार राज्यात पाहायला मिळत आहे. बिहारनंतर मेघालय (2.9) दुसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे. इथं एका महिलेला सरकारी दोन ते तीन मुलं असतात. त्यानंतरनंबर लागतो तो उत्तर प्रदेश या राज्याचा. या राज्यात 2.4 इतका प्रजनन दर आहे. झारखंड (2.3) आणि मणिपूर (2.2) यांसारखी राज्ये येतात. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
कोणत्या राज्याचा प्रजनन दर सर्वात कमी आहे?
याउलट काही राज्यात प्रजनन दर हा फारच कमी आहे. इथं सरासरी एकच मुल महिलेच्या पोटी होतं. त्यात पहिला क्रमांक हा गोवा राज्याचा लागतोय. इथला प्रजनन दर हा 1.3 एवढाच आहे. इथं महिलेला एकच मुल होतं. त्यानतंर सिक्कीम राज्यात 1.1, चंदीगड 1.3 आणि जम्मू-काश्मीर 1.4 यांसारख्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रजनन दर सर्वात कमी आहे. इथं सरासरी एक किंवा दोन मुलं जन्माला घातली जातात हे आकडेवारी वरून स्पष्ट झालं आहे.