Public Holiday: वर्ष 2025 संपायला आले असताना एक लाँग वीकेंड मिळणार आहे. त्यात 27 डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्याच्या नागरिकांसाठी असणार आहे. जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी 27 डिसेंबर 2025 (शनिवार) या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. शिख धर्माचे पूजनीय गुरु श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या जयंतीनिमित्त ही सुट्टी असेल. राज्य सरकारने 2025 च्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरमध्ये बदल करून ही तारीख निश्चित केली आहे. हा आदेश सर्व संबंधित विभागांना त्वरित पाठवण्यात आला आहे. त्यामुळे 27 डिसेंबरला सर्वत्र पूर्ण बंद राहणार आहे.
काय-काय बंद राहील?
- या आदेशामुळे उन्नाव जिल्ह्यातील खालील आस्थापने बंद राहतील.
- सर्व सरकारी कार्यालये (जिल्हा प्रशासन, तहसील, ब्लॉक कार्यालये)
- सर्व शाळा आणि महाविद्यालये (खाजगी आणि सरकारी दोन्ही)
- उत्तर प्रदेश मूलभूत शिक्षण परिषदेच्या शाळा
- बँका आणि इतर महत्त्वाची कार्यालयेही बंद राहण्याची शक्यता आहे.
सलग सुट्ट्यांचा मोठा फायदा!
27 डिसेंबरला शनिवार असल्याने आणि त्यानंतर लगेच 28 डिसेंबरला रविवार असल्याने लोकांना सलग 2 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. जे लोक शुक्रवार संध्याकाळनंतर प्रवास करू इच्छितात, त्यांना या लांब वीकेंडचा मोठा फायदा होईल. विद्यार्थी सुट्ट्यांमध्ये परीक्षांची तयारी करू शकतील किंवा कुटुंबासोबत वेळ घालवतील.
राज्याराज्यांमधील हिवाळी सुट्ट्या
दरम्यान, उत्तर प्रदेशात शाळांना 20 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत 12 दिवसांची हिवाळी सुट्टी आहे. तर राजस्थानमध्ये थंडीमुळे 25 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 पर्यंत सुट्टी असेल. ख्रिसमस (25 डिसेंबर) आणि इतर सुट्ट्यांमुळे डिसेंबरमध्ये विद्यार्थ्यांना खूप दिवस आराम मिळणार आहे. पालकांनी हवामानानुसार सुट्ट्यांमध्ये होणारे बदल तपासत राहणे गरजेचे आहे.