Shocking News: बर्थडे दिवशीच अंत! बड्या शिवसेना नेत्याच्या लेकीचा मृत्यू; अंघोळीला गेली अन् भयंकर घडलं

Shivsena Leader Daughter Death: सकाळी बाथरुममध्ये गेलेल्या मुनमूनचा  गॅस गिझरमुळे मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shiv Sena leader Daughter Death: नववर्षाचे स्वागत आणि स्वत:चा 22 वा वाढदिवस करण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना नेत्याच्या मुलीचा गॅस गिझरमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुनमून चितवन असे या मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून ती पंजाबमधील शिवसेना (उत्तर भारत) प्रमुख दीपक कंबोज यांची कन्या होती. जालंधरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बर्थडे दिवशीच 22 वर्षीय मुलीचा मृत्यू...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १ जानेवारी रोजी मुनमून चितवन (वय, २२) वाढदिवस होता, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र बर्थडेचा दिवसच तिच्यासाठी अखेरचा ठरेल याची कोणाला कल्पनाही नव्हती. सकाळी बाथरुममध्ये गेलेल्या मुनमूनचा  गॅस गिझरमुळे मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली.

New Year: नव्या वर्षात नवीन व्हायरस, आर्थिक मंदी, महागाईचे सावट? ज्योतिषाचार्यांची घाबरवणारी भविष्यवाणी

​मिळालेल्या माहितीनुसार, मुनमुन गुरुवारी सकाळी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपूर्वी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. यावेळी बाथरूममधील गॅस गिझरच्या पाईपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कार्बन मोनोऑक्साइड वायूची गळती सुरू झाली. बाथरूममध्ये वेंटिलेशनची पुरेशी व्यवस्था नसल्याने काही वेळातच मुनमुनला श्वास घेण्यास त्रास झाला आणि ती तिथेच बेशुद्ध पडली.

श्वास गुदमरल्यामुळे दुर्दैवी अंत..

बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता, ती मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्राथमिक वैद्यकीय अंदाजानुसार, गॅसमुळे दम घुटल्यानेच हा मृत्यू झाला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे हिवाळ्याच्या दिवसात वापरल्या जाणाऱ्या गॅस गिझरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement

दरम्यान, मृत तरुणी मुनमूनचे वडील  दिपक कंभोज यांनी सांगितले की, मुनमून खूप हुशार आणि मनमिळावू मुलगी होती. तिच्या वाढदिवसाची घरात जंगी तयारी करण्यात आली होती. मात्र नियतीने तिच्या बर्थडे दिवशीच घात केला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)