Rahul Gandhi : 'काळजी करु नका...' पाकिस्तानच्या सीमेवरील नागरिकांना राहुल गांधींनी काय दिलं आश्वासन?

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Rahul Gandhi Poonch Visits: काँग्रेस नेते राहुल गांधी  आज जम्मू-काश्मीरमधील पुंछचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी या भेटीची माहिती  एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे दिली. राहुल गांधींनी लिहिले की, 'आज मी पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात प्राण गमावलेल्या कुटुंबांना भेटलो. तुटलेली घरे, विखुरलेले सामान, पाणावलेले डोळे आणि प्रत्येक कोपऱ्यात आपल्या प्रियजनांना गमावल्याची हृदयद्रावक कहाणी... हे देशभक्त कुटुंबे प्रत्येक वेळी युद्धाचा मोठा भार साहस आणि सन्मानाने उचलतात. त्यांच्या धैर्याला सलाम.'

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पीडितांना दिलासा आणि विद्यार्थ्यांशी संवाद

राहुल गांधींनी पीडित कुटुंबीयांना आश्वासन दिले की, या कठीण प्रसंगात ते त्यांच्यासोबत आहेत. त्यांनी शाळकरी मुलांचीही भेट घेतली या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी मन लावून अभ्यास करावा आणि खूप मित्र बनवावेत, असा सल्ला राहुल यांनी दिला.  "मी तुम्हाला विश्वास देतो की, एक दिवस सर्व काही ठीक होईल," असेही ते म्हणाले.

'ही एक मोठी शोकांतिका आहे, अनेक लोकांचा जीव गेला आहे. खूप नुकसान झाले आहे,' असं राहुल यांनी यावेळी सांगितलं. आपण पीडित कुटुंबीयांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत, पीडितांच्या मागण्या आणि प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडू असं आश्वासनंही राहुल यांनी दिलं. 

गोळीबारात जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबीयांची भेट

राहुल गांधींनी पुंछमध्ये १२ वर्षांच्या जुळ्या भावंडांच्या, झोया आणि जैन यांच्या पालकांचीही भेट घेतली. पाकिस्तानी गोळीबारात या दोन्ही मुलांचा जीव गेला होता. राहुल गांधी म्हणाले की, या भेटीचा उद्देश पाकिस्तानी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांसोबत उभे राहणे आणि मानवी मूल्यांवर प्रकाश टाकणे हा होता. याव्यतिरिक्त, त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात नुकसान झालेल्या धार्मिक स्थळांनाही त्यांनी  भेट दिली.

Advertisement

( नक्की वाचा :  पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! 227 प्रवाशांचा जीव होता धोक्यात तरीही नाकारली लँडिंगची परवानगी )

पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधींचा दुसरा जम्मू-काश्मीर दौरा

पहलगाममधील हल्ल्यानंतर राहुल गांधींचा हा जम्मू-काश्मीरचा दुसरा दौरा आहे. यापूर्वी 25 एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना भेटण्यासाठी श्रीनगरचा दौरा केला होता.  

पुंछमध्ये 13 जणांचा मृत्यू

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पुंछ सेक्टरमध्ये गोळीबार वाढला होता. पाकिस्तानने 7 ते 10 मे दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये तोफांनी गोळे डागले आणि क्षेपणास्त्रे तसेच ड्रोननेही हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये 28 जण मारले गेले. त्यामध्ये पुंछ जिल्ह्यातल्या 13 जणांचा समावेश आहे. तसंच 70 पेक्षा जास्त जखमी झाले होते.  

Advertisement
Topics mentioned in this article