Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरीची संधी! तब्बल 1149 जागांवर भरती, कसा अन् कधी कराल अर्ज? जाणून घ्या

Railway ECR Recruitment 2025 News: रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) अंतर्गत पूर्व मध्य रेल्वेने (ECR) अप्रेंटिसच्या ११०० हून अधिक जागांसाठी भरती अधिसूचना (Official Notification) जारी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Railway ECR Recruitment 2025: भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी (Golden Opportunity) उपलब्ध झाली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) अंतर्गत पूर्व मध्य रेल्वेने (ECR) अप्रेंटिसच्या ११०० हून अधिक जागांसाठी भरती अधिसूचना (Official Notification) जारी केली आहे. या पदांवर उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय (No Exam) थेट मेरिट बेसवर (Merit-Based) केली जाणार असल्याने, ही एक मोठी संधी मानली जात आहे. (Railway Vacancy News)

महत्त्वाचे तपशील (Important Details):

पदाचे नाव (Post Name): अप्रेंटिस

(Apprentice) रिक्त पदे (Total Vacancy): ११४९

अर्ज सुरू होण्याची तारीख (Start Date): २६ सप्टेंबर २०२५

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last Date): २५ ऑक्टोबर २०२५

अधिकृत संकेतस्थळ (Official Website): ecr.indianrailways.gov.in

या भरतीद्वारे फिटर (Fitter), वेल्डर (Welder), मॅकेनिक (Mechanic), रेफ्रिजरेशन आणि एसी मॅकेनिक (Refrigeration & AC Mechanic), कारपेंटर (Carpenter), इलेक्ट्रीशियन (Electrician) आणि वायरमन (Wireman) अशा विविध ट्रेड्समध्ये उमेदवारांची निवड केली जाईल. अर्जदाराचे वय २५ ऑक्टोबर २०२५ रोजी १५ वर्षांपेक्षा कमी आणि २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. नियमानुसार वयोमर्यादेत सूट (Age Relaxation) दिली जाईल.

आवश्यक पात्रता (Eligibility Criteria):

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी किमान ५० टक्के गुणांसह (Minimum 50% Marks) मॅट्रिक किंवा दहावी (10th Pass) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच, अर्जदाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट (ITI Certificate) असणे अनिवार्य आहे.

निवड प्रक्रिया | What is Selection Process?

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट मेरिट लिस्टद्वारे केली जाईल. ही मेरिट लिस्ट दहावीच्या परीक्षेत (किमान ५०% गुणांसह) आणि आयटीआय परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर तयार केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार स्टायपेंड (Stipend) मिळेल.

Advertisement

Heart Attack Symptoms: अपुऱ्या झोपेमुळे होऊ शकते हार्ट फेल, डॉक्टरांनी सांगितले कारण

अर्ज कसा करावा?| How to Apply?

  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आरआरसी/पूमरेच्या (RRC/ECR) अधिकृत वेबसाइटवर (Official Website) ecr.indianrailways.gov.in जाऊन Hajipur H.Q>RRC/Patna वर लॉगइन करावे. 
  • अर्ज भरताना आधार कार्ड (Aadhaar Card) क्रमांक आणि सर्व शैक्षणिक (Academic) तसेच तांत्रिक (Technical) कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील.
  •  उमेदवाराने आपले स्कॅन केलेले रंगीत छायाचित्र (Photo) (साइज ३.५ सेमी X ३.५ सेमी, २० kb ते ७० kb) आणि स्वाक्षरी (Signature) (१० kb ते ३० kb) अपलोड (Upload) करावी लागेल. 
  • अर्ज शुल्क (Application Fee) ₹१०० असून, ते भरल्यानंतर फॉर्मची फायनल प्रिंट आऊट (Final Print Out) घेणे आवश्यक आहे.