Ratan Tata's Last Rites : एक होते टाटा ! देशाचे 'रतन' अनंतात विलीन

Ratan Tata's Last Rites  : गेल्या चार दशकात प्रत्येक भारतीयांच्या आयुष्याला कोणत्या तरी रुपात स्पर्श करणारे ऋषीतुल्य उद्योगपती रतन टाटा अनंतात विलीन झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Ratan Tata's Last Rites  : गेल्या चार दशकात प्रत्येक भारतीयांच्या आयुष्याला कोणत्या तरी रुपात स्पर्श करणारे ऋषीतुल्य उद्योगपती रतन टाटा अनंतात विलीन झाले आहेत. रतन टाटा यांचं बुधवारी (9 ऑक्टोबर) मुंबईतील हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यांच्यावर (10 ऑक्टोबर) गुरुवारी संध्याकाळी मुंबईमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान परिषदेसाठी लागोसला गेले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय गृहमंत्री रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी 'असमान्य व्यक्ती' या शब्दात रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

केंद्रीय गृहमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील अंत्यसंस्काराला उपस्थित होते. 

त्यापूर्वी, गुरुवारी दिवसभर राष्ट्रीय ध्वजामध्ये गुंडाळलेलं रतन टाटा यांचं पार्थिव नरमिन पॉईंटमधील NCPA सेंटरमध्ये सर्वांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. नरिमन पॉईंट ते वरळी स्मानशभूमी दरम्यान 12 किलोमीटर काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेमध्ये हजारो मुंबईकर सहभागी झाले होते. 

राजकीय क्षेत्रातील दिग्गज, सेलिब्रेटी, कलाकार, सुपरस्टार्सह बड्या उद्योपगतींनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. राज्य सरकारनं रतन टाटा यांच्या निधनाबद्दल एक दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. 

( नक्की वाचा : Ratan Tata Family : 2 BHK मध्ये राहणाऱ्या रतन टाटांच्या सख्ख्या भावाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? )
 

एक होते टाटा!

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईतील टाटा या पारशी कुटुंबात झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईत झालं. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी न्यूयॉर्क सिटीतील रिव्हरडेट कंट्री शाळेत घेतलं.   सुरुवातीच्या काळात ते टाटा एअरलाइन्स आणि टाटा इंडस्ट्रीजमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत होते. 1991 ते 2012 या काळात त्यांनी टाटा समूहाच्या  अध्यक्षपदाची जबाबदारी लीलया पेलली. ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते. 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला होता. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचं चारचाकी गाडीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक लाखाची नॅनो कार तयार करण्याची संकल्पना तयार करून ती प्रत्यक्षात आणली.


रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उद्योगाला सेवाभावी वृत्तीची झालर असलेला उद्योगपती होणे दुर्मीळ आहे.

Topics mentioned in this article