विक्रम! 9व्या अदाणी अहमदाबाद मॅरेथॉनमध्ये 24,000 हून अधिक धावपटूंचा सहभाग, नवा इतिहास

फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन आणि 10 किमी श्रेणींसाठी ₹40 लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

9th Adani Ahmedabad Marathon: अहमदाबाद शहराच्या साबरमती रिव्हरफ्रंट स्पोर्ट्स पार्कमध्ये 9 व्या अदाणी अहमदाबाद मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन झाले. यंदा 24,000 हून अधिक धावपटूंनी सहभाग घेऊन मॅरेथॉनच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. '#Run4OurSoldiers' या उद्देशावर आधारित या मॅरेथॉनला यंदा 'ऑपरेशन सिंदूर'च्या (Operation Sindoor) पार्श्वभूमीवर अधिक भावनिक महत्त्व प्राप्त झाले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडचे (AEL) संचालक प्रणव अदाणी, एअर मार्शल नागेश कपूर, मेजर जनरल गौरव बग्गा, अभिनेत्री व फिटनेस दूत मंदिरा बेदी, ऑलिम्पिक पदक विजेते गगन नारंग, अभिनेत्री प्रीती झंगियानी, आणि प्रसिद्ध डिझायनर आकीब वानी यांच्या हस्ते झाले.

यावेळी 4,000 हून अधिक लष्करी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. ज्यामुळे देशाच्या जवानांप्रती आदर आणि एकतेचा संदेश अधिक दृढ झाला. तसेच, भारतीय क्रिकेटपटू आणि गुजरात जायंट्सची (Gujarat Giants) नवीन खेळाडू यास्तिका भाटिया यांची उपस्थितीही लक्षणीय होती. धावपटूंनी फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 किमी आणि 5 किमी या चार श्रेणींमध्ये स्पर्धा केली. मॅरेथॉनचा मार्ग गांधी आश्रम (Gandhi Ashram), अटल पूल (Atal Bridge) आणि एलिस ब्रिज (Ellis Bridge) यांसारख्या अहमदाबादमधील प्रतिष्ठित स्थळांवरून गेला होता. फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन आणि 10 किमी श्रेणींसाठी ₹40 लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती. 

एथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (AFI) मान्यता दिलेल्या आणि AIMS (Association of International Marathons and Distance Races) ग्लोबल मॅरेथॉन इव्हेंट लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या या मॅरेथॉनने जागतिक मापदंड पूर्ण केले आहेत. या स्पर्धेची प्रमुख विजेते पुढील प्रमाणे आहेत. 

प्रमुख विजेते:

  • फुल मॅरेथॉन (पुरुष): निखिल सिंग (02:22:49)
  • फुल मॅरेथॉन (महिला): अश्विनी जाधव (02:56:49)
  • हाफ मॅरेथॉन (पुरुष): धर्मेद्र (01:31:31)
  • हाफ मॅरेथॉन (महिला): फरहीन फिरदोसे (01:03:48)

अदाणी समूहाचे प्रणव अदाणी म्हणाले, "2017 पासून ही मॅरेथॉन शहराने आपलीशी केली आहे.  यंदाचा 24,000 स्पर्धकांचा सहभाग हा त्याचा पुरावा आहे. जवानांप्रती आदर व्यक्त करण्याची ही एक मोठी चळवळ झाली आहे असं ते यावेळी म्हणाले. तर मेजर जनरल गौरव बग्गा यांनीही नागरिकांचा उत्साह पाहून आनंद व्यक्त केला.

Advertisement