'हिंदूंना विनाकारण...' बांगलादेशमधील हिंसाचारावर काय म्हणाले RSS प्रमुख?

RSS on Bangladesh Violence : बांगालादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
R
नागपूर:

बांगालादेशमध्ये (Bangladesh हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. हसीना आता भारतामध्ये आश्रयाला आल्या आहेत. हसीना यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये देशातील अल्पसंख्याक हिंदू समाजावर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनी नागपुरातील संघाच्या मुख्यालयात ध्वाजरोहण झाल्यानंतर भागवत यांनी या विषयावर संघाची भूमिका स्पष्ट केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले भागवत?

भागवत यांनी यावेळी सांगितलं की, 'तिथं राहणाऱ्या हिंदूंना विनाकारण हिंसाचारची झळ सहन करावी लागत आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा अन्याय आणि अत्याचार सहन करावा लागू नये हे निश्चित करण्याची जबाबदारी आपली आहे. स्वतत्रंत्रेमधील 'स्व' चं रक्षण करणे ही आगामी पिढीची जबाबदारी आहे. कारण, जगात इतर देशांवर वरचढ होण्याची महत्त्वकांक्षा असलेले अनेक देश आहेत. आपल्याला त्यांच्यापासून सतर्क आणि सावध राहिलं पाहिजे. तसंच स्वरक्षण करायला हवं.' 

त्यांनी बांगलादेशचं नाव न घेता सांगितलं की, 'आपल्या शेजारच्या देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असल्याचं अपण पाहात आहोत. तिथं राहणाऱ्या हिंदूना विनाकारण या परिस्थितीचा सामना करावा लागतोय.'

( नक्की वाचा : 'पुढची 5 वर्ष भयंकर, जग युद्धाच्या उंबरठ्यावर' परराष्ट्रमंत्र्यांची भविष्यवाणी! अमेरिकेलाही सुनावलं )
 

सरसंघचालक पुढे म्हणाले की, 'दुसऱ्यांची मदत करणे ही भारताची परंपरा आहे. आपण गेल्या काही वर्षांपासून पाहिलंय की भारतानं कधीही कुणावर हल्ला केला नाही. उलट अडचणीत सापडलेल्या लोकांची मदत केली. त्यांच्याशी आपला व्यवहार कसाही असला तरी आपण मदत केली आहे.'

अस्थिरता आणि अराजकतेचा फटका सहन करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास, अन्याय आणि अत्याचाराचा सामना करावा लागू नये हे निश्चित करणे आपली जबाबदारी आहे. काही प्रकरणात सरकारलाही पाहावं लागतं. पण, समाज म्हणून आपण कर्तव्य केलं आणि देश म्हणून कटिबद्धता दाखवली तरच सरकारला बळ मिळतं,' असं त्यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement