12 मजले, 3 टॉवर, आणि 150 कोटी खर्च ! कसं आहे दिल्लीतील RSS चं कार्यालय? पाहा Photo

RSS Office New Delhi : नवी दिल्लीतील झंडेवालन भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (RSS)  अत्याधुनिक कार्यालय उभारण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

RSS Office New Delhi :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नवी दिल्लीतील नव्या कार्यलायचं उद्घाटन बुधवारी (19 फेब्रुवारी 2025) रोजी करण्यात आले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवजयंतीच्या दिवशी या कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. 
 

नवी दिल्लीतील झंडेवालान भागात हे अत्याधुनिक कार्यालय आहे.  हे कार्यालय 12 मजली असून त्यामध्ये 3 टॉवर आहेत. यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या बैठकीची तसंच भोजनाची व्यवस्था आहे. सुमारे 150 कोटी रुपये खर्च करुन हे कार्यालय उभारण्यात आलं आहे. जवळपास 75000 जणांनी हा निधी उभारण्यासाठी योगदान दिलं आहे. 


या कार्यालयाच्या अंतर्गत सजावटीचं काम अजून सुरु आहे. सप्टेंबरमध्ये हे कार्यालय सुरु होईल. देशाच्या फाळणीपूर्वी 1939 साली केशवकुंजमध्ये हे कार्यालय सुरु करण्यात आलं. 1962 साली हे कार्यालय एक मजली उभारण्यात आले. 1962 मध्ये हे दोन मजली उभारण्यात आले. हे कार्यालय 4 एकर परिसरात बनवण्यात आले आहे. 

या कार्यालयात तीन टॉवर आहेत. पहिल्या टॉवरचं नाव प्रेरणा तर दुसऱ्याचं नाव अर्चना ठेवण्यात आलंय.  त्याखाली G+12 मजले आहेत. 300 खोल्या आहे. राहण्यासाठी तसंच कार्यालयीन कामकाजासाठी 270 कारच्या यांत्रिक पार्किंगची सोय इथं करण्यात आलीय. 

Advertisement

भारतीय स्थापत्य शैलीनुसार या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. 75000 जणांनी या कार्यालयाच्या निर्मितीमध्ये योगदान दिलंय. या कार्यालयाच्या वास्तूचे भूमिपूजन 2016 साली करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषदते दिवंगत महामंत्री अशोक सिंघल यांचं नाव यांचं नाव येथील एका सभागृहाला देण्यात आलंय. या कार्यालयात आणखी देखील काही हॉल आहेत. कार्यालयातील वीज सौर उर्जेतून निर्माण करण्यात येईल. संपूर्ण घरामध्ये 1000 दरवाजाच्या चौकटी बसवण्यात आल्या असून त्या सर्व ग्रॅनाइटच्या आहेत. 

सरसंघचालक आणि सरकार्यवाहांच्या राहण्याची इथं व्यवस्था करण्यात आली आहे. दहाव्या मजल्यावर ग्रंथालय असून त्यामध्ये 8500 पुस्तकं आहेत. तळमजल्यावर क्लिनिक असेल. त्यामध्ये जवळपासच्या लोकांना उपचार घेता येतील. या हॉस्पिटलमध्ये पाच बेडची व्यवस्था आहे. नवव्या मजल्यावर पत्रकार परिषदेची व्यवस्था आहे. त्याची क्षमता 120 आहे. 

Advertisement


या कार्यालयात भोजनालयाची व्यवस्थाही आहे. त्यामध्ये एकाचवेळी 80 जण बसून जेवण करु शकतील. या कार्यालयाचं नाव केशव कुंजच असेल. संपूर्ण कार्यालयाच्या सुरक्षेवर सीसीटीव्हीनं देखरेख केली जाईल.

Topics mentioned in this article