- सीमा हैदर, पाकिस्तानातून अवैध मार्गे भारतात आली होती
- सीमा हैदरने सचिन मीणासोबत लग्न केलं. त्याच्या पासून तिला दोन मुलं आहेत.
- सीमा आणि सचिन यांची ओळख सोशल मीडियावरून झाली होती
ग्रेटर नोएडातील रबुपुरा येथे वास्तव्यास असलेली सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मंगळवारी तिने एका खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, माता आणि बालक दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला आता एकूण सहा मुलांची आई झाली आहेत. सचिन मीणासोबतचे हे तिचे दुसरे अपत्य आहे. सचिन सोबत येण्या आधी तिला चार मुले होती. त्या मुलांसह ही दुबई, नेपाळ मार्गे भारतात आली होती. नेपाळमध्येची तिने सचिन मिणासोबत लग्न केलं होतं.
सीमा हैदरने 18 मार्च 2025 रोजी एका मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर अवघ्या 11 महिन्यांच्या आतच तिने मुलाला जन्म दिला आहे. सीमाला तिच्या पहिल्या पतीपासून (गुलाम हैदर) चार मुले आहेत. तर सचिन मीणापासून आता तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सीमा आणि सचिन यांच्या सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. या प्रेमासाठीच ती पाकिस्तानातून थेट भारतात आली होती. गेल्या काही वर्षापासून ती सचिन सोबत दिल्लीत राहात आहे.
ऑनलाइन गेमच्या माध्यमातून ओळखीनंतर सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली होती. या प्रकरणाची देशभर चर्चा झाली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनीही सीमाची चौकशी केली होती. तीला अटक ही करण्यात आली होती. ती अवैध पद्धतीने भारतात आली होती. याबाबतची केस अजून ही सुरू आहे. सध्या ती जामिनावर असून ग्रेटर नोएडामध्ये स्थायिक झाली आहे. सीमा पाकिस्तानी हेर आहे का याबाबतची वेगवेगळ्या चर्चा झाल्या होत्या. आता तिने सचिन सोबत संसार थाटला आहे. शिवाय आपण हिंदू असल्याचं ही ती आता सांगत आहे.
सीमा आणि सचिन नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. मुलाच्या जन्मानंतर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये सीमाने मुलीला जन्म दिला होता आणि आता मुलाच्या आगमनाने मीणा कुटुंब पूर्ण झाले आहे. सीमाच्या पहिल्या चार मुलांनीही आपल्या धाकट्या भावाचे उत्साहात स्वागत केले आहे. सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.