बांगलादेशच्या (Bangladesh Violence) इतिहासात सोमवार 5 ऑगस्ट हा दिवस कधीही विसरला जाणार नाही. याच दिवशी बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे पंतप्रधान शेख हसीना (Sheik Hasina) यांना झुकावं लागलं. शिवाय पंतप्रधानपदाचा राजीनामा देवून देशही सोडावा लागला. आंदोलनाची ती 15 मिनिटे 15 वर्षाच्या हसीना यांच्या सत्तेवर भारी पडली. शेख हसीना या त्यांच्या अलिशान घरातून बाहेर पडल्यानंतर आंदोलनकर्ते त्या घरात घुसले होते. त्यावेळी त्यांनी महागड्या मौल्यवान वस्तुंचीही लूट केली. त्यानंतर सर्वांच्याच मनात एक प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे शेख हसीना यांनी बांगलादेश सोडताना त्यांच्या बरोबर काय काय आणलं? त्यात किती पैसे, दागिने, मालमत्तेची कागदपत्रे होती का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. की रिकाम्या हातानेच शेख हसीना भारतात आल्या अशीही विचारणा होत आहे.
बांगलादेशमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते. त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नव्हते. अशा स्थितीत शेख हसीना या लष्कराच्या विमानाने ढाक्यावरून भारतात आल्या. त्यासाठी त्यांनी लष्कराचे AJAX1431 हे विमान त्यांनी वापरले. ढाक्यावरन त्या अगरतळ्याला पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी दिल्ली गाठली. भारतात त्या अशा ठिकाणी उतरल्या ज्या विमानतळाचा कोणीही वापर करत नाही. या विमानतळाचा वापर केवळ लष्करासाठी केला जातो. ज्या वेळा हसीना यांनी ढाका सोडलं त्यावेळी त्यांच्या बरोबर दोन मोठ्या बॅग होत्या. देश सोडण्यासाठी त्यांच्याकडे केवळ 45 मिनिटे होती. अशा आणीबाणीच्या स्थितीत अजून काही आपल्या बरोबर घ्यावे हेही त्यांना सुचले नाही.
त्या 2 बॅगमध्ये काय काय आणलं?
सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शेख हसीना या बांगलादेशातून येताना आपल्या बरोबर दोन बॅग घेवून आल्या होत्या. त्यात आवश्यक कपडे आणि काही गरजेच्या वस्तू होत्या. या शिवाय त्यांना काहीच आणता आलेले नाही. त्यांच्या घरातले सामान आंदोलनकर्ते लुटून नेत होते. याचे व्हिडीओ सर्वांनीच पाहीले. शेख हसीना यांच्याकडे अनेक बँक खाती आहेत. ज्यामध्ये करोडो रूपये जमा आहेत. मात्र त्या पैशांचाही त्यांना काही उपयोग होणार नाही.
शेख हसीना पैसे कसे वापरणार?
शेख हसीना यांच्या बँक खात्यात करोडो रूपये आहेत. असं असलं तरी त्यांना त्या पैशाचा उपभोग घेता येणार नाही. त्यांना एकही रूपयाचा व्यवहार करता येणार नाही. त्यांनी ज्या क्षणाला देश सोडला त्याच वेळी त्यांची बँक खाती गोठवण्यात आली. त्यामुळे त्यांना त्या पैशांचा वापर करता येणार नाही. तसं पाहीलं तर शेख हसीना या करोडो रूपयांच्या मालकीण आहेत. 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते त्यात 4.36 करोड बांगलादेशी टकाच्या येवढी त्यांची संपत्ती होती. भारतीय रूपयांत विचार केल्यास त्या 3.14 करोडच्या मालकीण आहेत.
घरातल्या मौल्यवान सामानाचे काय होणार?
शेख हसीना या पंतप्रधानपद सोडण्यास तयार नव्हत्या, अशी माहिती प्रोथोम अलो समाचार पत्रानं दिली आहे. मात्र लष्कराने सैन्य बळाचा वापर करण्यास नकार दिला. आंदोलनकर्त्यां विरोधात बळाचा वापर करता येणार नाही असं त्यांनी शेख हसीना यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. तातडीने देशही सोडला. त्यानंतर त्यांच्या घरात आंदोलनकर्ते घुसले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि लुटही केली. घरातल्या अनेक गोष्टी चोरल्या गेल्या. ढाकात असलेल्या रिक्षामधून हे लुट केलेले सामान घेवून जातानाचे व्हिडीओही समोर आले आहेत.