Barabanki Stampede: शिवमंदिरात चेंगराचेंगरी! 2 भाविकांचा मृत्यू, 29 जखमी, श्रावण सोमवारामुळे गर्दी झाली अन्...

Shravan Somvar 2025 Barabanki Awsaneshwar Temple Stampede: करंट पसरल्याने भाविकांमध्ये घबराट पसरली आणि लोक आरडाओरडा करत इकडे तिकडे धावू लागले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Barabanki Awsaneshwar Mahadev Temple Stampede: उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मानसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आता उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथेही चेंगराचेंगरी घटना घडली आहे. बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगड परिसरात असलेल्या पौराणिक औसनेश्वर महादेव मंदिरात रविवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. करंट पसरल्याच्या बातमीमुळे मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी आहेत.

Mansa Devi Temple Stamped: मोठी दु्र्घटना! मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 भाविकांचा मृत्यू

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी रात्री 12 वाजल्यानंतर जलाभिषेकासाठी जमलेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीत जलाभिषेक सुरू झाला. दरम्यान दुपारी 2 वाजताच्या सुमारास मंदिर परिसरात अचानक करंट पसरला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. करंट पसरल्याने भाविकांमध्ये घबराट पसरली आणि लोक आरडाओरडा करत इकडे तिकडे धावू लागले. या दुर्घटनेत दोन भाविक जागीच मृत्युमुखी पडले आहेत, तर 29 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

सुरक्षेसाठी मंदिर परिसरात आधीच पोलिसांचा ताफा उपस्थित होता. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सर्व जखमींना रुग्णवाहिकेने हैदरगड आणि त्रिवेदीगंज सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले तर काही गंभीर जखमींना बाराबंकी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी आणि पोलिस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय यांच्यासह उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, काही माकडे विद्युत तारेवर उड्या मारल्याने तार तुटली आणि मंदिर परिसरातील टिन शेडवर पडली. त्यामुळे विद्युत प्रवाह पसरला आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.

Advertisement

Shravan 2025 Horoscope : श्रावण महिन्याचे राशीभविष्य! नोकरी, व्यवसाय, आरोग्य, आर्थिक जीवन कसे असेल? जाणून घ्या उपाय

दरम्यान, जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बाराबंकी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि परिस्थिती हाताळत आहेत. या घटनेनंतर, औसनेश्वर महादेव मंदिरातील परिस्थिती सामान्य आहे. घटनेनंतर, मंदिरात आलेले लोक नियमितपणे दर्शन आणि पूजा करत आहेत. ही घटना कशी घडली याचा तपास अजूनही सुरू आहे.