मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (CPIM) वरिष्ठ नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांचे दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. निमोनियावरील उपचारासाठी 19 ऑगस्ट रोजी त्यांना नवी दिल्लीमधील अखिल भारतीय आयुर्वित्रान संस्थेमध्ये (AIIMS) दाखल करण्यात आले होते. एम्समध्येच त्यांची प्राणज्योत मालावली. वरिष्ठ पत्रकार सीमा चिश्ती, मुलगी अखिला आणि मुलगा दानिश असा त्यांच्या पश्चात्य परिवार आहे. त्यांचा 34 वर्षाचा मुलगा आशिष येचुरीचा 2021 साली कोव्हिडमुळे मृत्यू झाला होता. सीताराम येचुरींचा इंदिरा गांधींसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या फोटोचं सत्य काय हे जाणून घेऊया
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माजी पंतप्रधान इंदिरा गांधीसोबतचा सीताराम येचुरी यांचा एक जुना फोटो चुकीच्या माहितीसह व्हायरल होत आहे. हा फोटो अनेक सोशल माीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमधील करण्यात आलेल्या दाव्यानुसार, 1975 साली आणीबाणीच्या दरम्यान इंदिरा गांधी यांनी दिल्ली पोलिसांसोबत जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये (JNU) प्रवेश केला होता.
माकप नेते सीताराम येचुरी तेंव्हा जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांना आणीबाणीचा विरोध करण्याबद्दल राजीनामा देण्यास आणि सार्वजनिक माफी मागण्यासाठी भाग पाडण्यात आले होते.'
( नक्की वाचा : Sitaram Yechury Passes Away : माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं निधन )
काय आहे सत्य?
या फोटोचं सत्य वेगळं आहे. हा फोटो जवाहरला नेहरु विद्यापीठातील नसून इंदिरा गांधींच्या घराबाहेर काढण्यात आला होता. 1977 साली आणीबाणी समाप्त झाली होती. त्यानंतर येचुरी यांनी या आंदोलनाचं आयोजन केलं होतं. इंदिरा गांधी यांनी संस्थेच्या कुलगुरुपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी येचुरी यांनी केली होती. या फोटोमध्ये इंदिरा गांधी विद्यार्थी संघटनेच्या मागण्या वाचत असलेल्या येचुरींचं भाषण ऐकत आहेत. आणिबाणीनंतर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही इंदिरा गांधी यांनी कुलगुरूपद सोडलं नव्हतं.
आघाडीच्या राजकारणाचे समर्थक
कॉम्रेड हरकिशन सिंह सुरजीत यांचे शिष्य असलेल्या सीताराम येचुरी यांनी आघाडी सरकारच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या राष्ट्रीय मोर्चा सरकारच्या कार्यकाळात तसंच 1996-97 मधील संयुक्त मोर्चा सरकारला माकपनं बाहेरुन पाठिंबा दिला होता. या निर्णयात येचुरी यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. आघाजी सरकारचे ते कट्टर पाठराखे होते. या काळात त्यांनी डाव्या तसंच धर्मनिरपेक्ष सरकारला आकार आणि बौद्धिक स्तरावरील विचार देण्याचं काम केलं.