- दक्षिणी बेंगलुरु के सुड्डागुंटेपाल्या में 27 वर्षीय सॉफ्टवेयर इंजीनियर शिल्पा का फंदे से शव मिला है.
- शिल्पा के माता-पिता ने दहेज प्रताड़ना के कारण उनकी बेटी की आत्महत्या की शिकायत पुलिस में दर्ज कराई है.
- शादी के समय शिल्पा के ससुराल वालों ने पंद्रह लाख रुपये नकद और सोने के गहने दहेज में लिए थे.
बेंगळूरूमधील एका 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, तिचा पती आणि सासरच्या मंडळींवर मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. शिल्पा असे या इंजिनिअरचे नाव आहे. शिल्पाचा मृतदेह तिच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याप्रकरणी तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, हुंड्यासाठी सततच्या छळामुळे त्यांच्या मुलीने आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे.
15 लाख रुपये हुंडा देऊनही छळ
शिल्पाचे लग्न सुमारे अडीच वर्षांपूर्वी प्रवीणसोबत झाले होते. प्रवीण देखील एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. पण लग्नानंतर एक वर्षाने त्याने नोकरी सोडून स्वतःचा खाद्य व्यवसाय सुरू केला. शिल्पाला एक दीड वर्षांचे बाळ आहे. शिल्पाच्या आई-वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रवीणच्या कुटुंबाने लग्नाच्या वेळी 15 लाख रुपये रोख, 150 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि घरगुती वस्तूंची मागणी केली होती.
या मागण्या पूर्ण करूनही, लग्नानंतर सासरच्या लोकांनी तिच्याकडे अधिक पैसे आणि मौल्यवान वस्तूंची मागणी केली. या वारंवार होणाऱ्या मानसिक आणि आर्थिक छळामुळेच शिल्पाने आपले जीवन संपवल्याचा तिच्या कुटुंबाचा दावा आहे.
शिल्पाच्या कुटुंबाने तिच्या सासरच्या मंडळींवर तिच्या रंगावरूनही टोमणे मारल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार, तिच्या सासूने कथितपणे म्हटले होते की, "तू काळी आहेस आणि माझ्या मुलासाठी चांगली जोडी नाहीस. त्याला सोडून दे, आम्ही त्याच्यासाठी एक चांगली वधू शोधू."
(नक्की वाचा- Manoj Jarange Patil : 'जरांगे फॅक्टर' पुन्हा चर्चेत! कोण करतं नियोजन, पडद्यामागील 8 कारभारी माहिती आहेत?)
नवऱ्याला अटक, पोलिसांकडून चौकशी
तक्रारीत पुढे असे म्हटले आहे की, सहा महिन्यांपूर्वी प्रवीणच्या कुटुंबाने त्याच्या व्यवसायासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली होती, जी शिल्पाच्या कुटुंबाने अखेर दिली होती. पोलिसांनी हुंड्यासाठी छळ आणि अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्रवीणला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |