Inspirational Story: मालती मुर्मू यांच्या मातीच्या घरात ‘आशेची शाळा’, पगार न घेता शिकवतात 45 मुलांना

अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या मातीच्या घरात मुलांना शिकवायला सुरुवात केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Success story of Malti Murmu: काही गोष्टी अशा असतात, ज्यामुळे आपल्याला विचार करायला भाग पाडले जाते. आज आपण अशा एका महिलेबद्दल बोलणार आहोत, जिने गरीब असतानाही त्याची पर्वा न करता गरीबीतूनच मोठं कार्य करण्याची संधी निर्माण केली. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील अयोध्या टेकड्यांच्या मधोमध असलेल्या जिलिंगसेरेंग गावात ही महिला राहाते. मालती मुर्मू असं त्याचं नाव आहे. त्यांनी आपल्या मातीच्या घरालाच शाळा केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालती यांच्याकडे कोणत्याही प्रकारची पदवी नाही. त्या शिक्षिका नाहीत किंवा कोणत्याही संस्थेचा भाग नाहीत. त्यांच्याकडे आहे फक्त इच्छाशक्ती आणि धाडस. त्यामुळे त्या  आज 45 मुलांना शिक्षण देण्याचं काम करत आहेत. 

2020 मध्ये मालती लग्नानंतर त्यांच्या सासरी जिलिंगसेरेंग येथे आल्या. तेव्हा त्यांना दिसले की गावातील शिक्षणाची स्थिती खूप दयनीय आहे. शाळा होती, पण ती खूप लांब होती. त्यामुळे मुले शाळेत जात नव्हती. शिक्षणाबद्दल जागृकतेचीही खूप कमतरता होती. हे पाहून मालती यांना भविष्याची चिंता वाटली आणि त्यांनी मनातल्या मनात निश्चय केला की त्या गावातील लोकांना शिक्षणाबद्दल जागरूक करतील. त्यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती. पण शिक्षणाबाबत त्यांना आवड होती. 

नक्की वाचा - Nashik News: घरांना हादरे बसले, काचा फुटल्या; नाशिककरांमध्ये घबराट, नेमकं काय घडलं?

अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या मातीच्या घरात मुलांना शिकवायला सुरुवात केली. शाळा चालवण्यासाठी मालती यांच्याकडे फक्त काही पुस्तके, ब्लॅकबोर्ड आणि उत्साह होता. आज मालती कोणतीही फी न घेता 45 मुलांना संथाली, बंगाली आणि इंग्रजी शिकवत आहेत. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्यांच्या धाडसामुळे त्या डगमगल्या नाहीत. त्यांच्या या पुढाकाराने गावकऱ्यांमध्येही आशा निर्माण झाली. हळूहळू संपूर्ण गावाने त्यांना साथ द्यायला सुरुवात केली. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार मदत केली. कोणी पुस्तके दिली तर कोणी मुलांना बसण्याची व्यवस्था केली.

नक्की वाचा - Raj Thackeray: 'मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्विकारतो!', राज ठाकरेंनी कार्यकर्त्याचीच घेतली फिरकी, पाहा Video

मालती यांच्या या कामात त्यांचे पती बांका मुर्मू, जे रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. त्यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली. विशेष म्हणजे मालती यांना दोन मुले आहेत. तरीही त्यांनी घराची जबाबदारी पार पाडत आपली उत्कटता कायम ठेवली.जेव्हा मालती यांची कथा सोशल मीडियावर व्हायरल झाली, तेव्हा अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. कोणी स्टेशनरी, पुस्तके दिली तर कोणी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे मालती यांची शाळा सुरू झाली आणि आज ही शाळा गावाचा अभिमान बनली आहे. मालती यांची ही कथा आपल्याला शिकवते की जर आपल्यामध्ये उत्कटता आणि धाडस असेल, तर आपण कमी संसाधनांमध्येही मोठे यश मिळवू शकतो.

Advertisement