गृहमंत्री म्हणून काश्मीरला जाताना माझी @#$%@ होती, सुशीलकुमार शिंदेंची धक्कादायक कबुली

Sushilkumar Shinde: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेतय. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द झाल्यानंतर तिथं होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीचा प्रचार रंगत आला असतानाच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

सुशीलकुमार शिंदे यांच्या 'पाच दशकाचे राजकारण' या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं. त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री असतानाचा एक काश्मीरला दिलेल्या भेटीसंदर्भातील किस्सा सांगितला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले शिंदे?

मी गृहमंत्री होण्यापूर्वी शिक्षणतज्ज्ञ विजय धर यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडं जात असे. त्यांनी मला इतरत्र कुठंही न फिरता श्रीनगरमधील लाल चौकात जाण्याचा आणि दाल लेकच्या भोवतलाच्या लोकांना भेटण्याचा सल्ला दिला. 

त्या सल्ल्यानं मला प्रसिद्धी मिळाली. कोणतीही भीती न बाळगता तिथं जाणारा गृहमंत्री आहे, असं लोकांना वाटलं. पण माझी @#$%@ (आक्षेपार्ह शब्द) होती हे कुणाला सांगू? असं वक्तव्य शिंदे यांनी केलं. त्यानंतर लगेच मी हे तुम्हाला फक्त हसवण्यासाठी सांगत आहे. माझी पोलीस कर्मचाऱ्य़ानं असं बोलता कामा नये, असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं. 

कधी होते शिंदे गृहमंत्री?

यूपीए 2 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते. पी चिदंबरम यांच्यानंतर 2012 साली त्यांची केंद्रीय गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शिंदे यांनी काश्मीरच्या भेटीमध्ये श्रीनगरमधील लाल चौकात खरेदी केली होती. त्याचबरोबर त्यांनी काश्मीर आर्ट शो रुमलाही कुटुंबीयांसह भेट दिली होती. जम्मू काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला देखील त्यावेळी शिंदेच्या सोबत होते. 

( नक्की वाचा : राहुल गांधींची अमेरिकेतून RSS वर वादग्रस्त टीका, भाजपानं दिला इंदिरा गांधींचा दाखला... प्रकरण काय? )
 

लाल चौक ही श्रीनगरमधील ऐतिहसिक जागा आहे. जम्मू काश्मीरमधील अशांत परिस्थितीमध्ये या भागात दहशतवाद्यांचा मोठा प्रभाव होता. लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी 1992 साली भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर तिरंगा यात्रा काढली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या त्या यात्रेचे संयोजक होते.