Tajmahal Viral Video: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. हे सौंदर्यासाठी आणि वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी, दररोज येथे लाखो-हजारो पर्यटक येतात आणि तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेतात. मात्र येथे येणाऱ्यांना बहुतेक वेळा तोच भाग पाहायला मिळतो, जो सर्वांसाठी खुला असतो. पण एका व्यक्तीने आतला असा नजारा कॅप्चर केला आहे, जो कदाचित कोणीच पाहिला नसेल.
व्हायरल व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने दावा केला आहे की तो ज्या जागेचे दर्शन घडवत आहे, तिथेच शाहजहान आणि मुमताज यांची खरी कब्र आहे. ही जागा सामान्य लोकांसाठी नेहमी खुली नसते, त्यामुळे हा व्हिडिओ लोकांमध्ये झपाट्याने चर्चेचा विषय बनला आहे. युजर्सही यावर भरपूर कमेंट करत आहेत आणि त्या नजाऱ्यासोबत व्हिडिओमध्ये लावलेल्या रफी साहेबांच्या गाण्याचीही चर्चा करत आहेत.
नक्की वाचा >> ना फॅमिली, ना पत्नी..'या' अभिनेत्रीच्या एका धमकीला घाबरले होते धर्मेंद्र, दारू पिणंच बंद केलं होतं
त्या व्हायरल व्हिडीओत दिसला खरा ताजमहाल
व्हिडिओच्या सबटायटलमध्ये त्या व्यक्तीने लिहिले आहे – ‘मुमताज आणि शाहजहान यांचे खरे कब्रस्थान, आज तुम्हाला दाखवतो खरा ताजमहाल.' तो हळूहळू पायऱ्यांवरून खाली उतरतो आणि जमिनीखाली असलेली कब्र दाखवतो. ‘आज तक'च्या रिपोर्टनुसार, ताजमहाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना शाहजहान आणि मुमताज यांची बनावट कब्र म्हणजेच ‘सिनोटॅफ' दाखवली जाते.
ज्या सुंदर नक्षीदार संगमरवरी कबरी मध्यभागी असलेल्या हॉलमध्ये ठेवलेल्या आहेत, त्या कबरींच्या खाली एक भूमिगत कक्ष आहे. हा भाग जवळजवळ नेहमीच बंद ठेवला जातो आणि फारच क्वचित प्रसंगी उघडला जातो. मात्र व्हायरल व्हिडिओमध्ये हे स्पष्ट होत नाही की ते ‘सिनोटॅफ' आहे की खरी कब्र.
नक्की वाचा >>Video: हाताने कुकर उघडलं नाही, महिलेनं लावला दिमाग! केलं असं काही..सोशल मीडियावर बायकांनी केलं भरभरून कौतुक!