Tatkal Ticket Booking Rules Change: जर तुम्ही तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेच्या आरक्षण काउंटरवर जात असाल तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. १ ऑगस्टपासून तुमच्यासाठी एक मोठा बदल होणार आहे. भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट काउंटर बुकिंगसाठी एक नवीन टोकन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. काउंटरवरील गर्दी कमी करणे आणि प्रवाशांसाठी बुकिंग प्रक्रिया सोपी करणे हा याचा उद्देश आहे. नेमकं काय आहे बदल? काय होईल प्रवाशांना फायदा? जाणून घ्या...
काय आहे रेल्वेचा नवा नियम?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा अन् महत्त्वाचा बदल केला आहे. या नवीन प्रणालीमध्ये तत्काळ तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना प्रथम एक टोकन दिले जाईल. त्यानंतर त्यांची पाळी त्या टोकनला दिली जाईल आणि तिकीट बुक केले जाईल. यामुळे काउंटरवरील धक्काबुक्की आणि लांब रांगांचा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे.
पूर्वीचा नियम काय होता? प्रवाशांना कसा होईल फायदा?
पूर्वी, प्रवाशांना टोकन मिळवण्यासाठी एका वेगळ्या काउंटरवर जावे लागत असे. त्यानंतर, तिकीट बुक करण्यासाठी त्यांना पुन्हा रांगेत उभे राहावे लागत असे. याचा अर्थ लोकांना दोनदा काउंटरवर जावे लागत असे. नवीन प्रणालीमुळे हा त्रास लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. या नवीन टोकन प्रणालीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, प्रवाशांना तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आता आरक्षण काउंटरवर वारंवार जावे लागणार नाही.
प्रथम टोकन मिळाल्याने, ते आपल्या पाळीची आरामात वाट पाहू शकतील. यामुळे काउंटरवरील गर्दी कमी होईल आणि तिकीट बुकिंग प्रक्रिया सोपी होईल. दरम्यान, जर तुम्ही तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आरक्षण काउंटरवर जात असाल, तर तुमच्यासोबत तुमचे आधार कार्ड किंवा इतर वैध फोटो ओळखपत्र असल्याची खात्री करा. तसेच, सर्व प्रवाशांची नावे, वय आणि प्रवासाचा तपशील आगाऊ तयार ठेवा. यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेला गती मिळू शकते.
Mumbra News: मुंब्र्यात मोठी दुर्घटना! इमारतीचा स्लॅब कोसळून 13 वर्षीय मुलीचा अंत; 5 जण बचावले