Indigo नाही, जगातील 'या' फ्लाईट्स होतात सर्वात जास्त वेळा रद्द, तुमची फ्लाईट 'या' लिस्टमध्ये आहे का?

इंडिगो एअरलाईन्स रद्द झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इंडिगो एअरलाईन्सने आपली अनेक फ्लाइट्स रद्द केल्याचा आज पाचवा दिवस आहे. अशातच अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Worst Airlines In The World
मुंबई:

Worst Airlines Flight Delays :  इंडिगो एअरलाईन्स रद्द झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इंडिगो एअरलाईन्सने आपली अनेक फ्लाइट्स रद्द केल्याचा आज पाचवा दिवस आहे. शेवटच्या क्षणी फ्लाइट रद्द झाल्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती. त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

फ्लाइट रद्द होण्याची अनेक कारणे असतात,जसे की खराब हवामान,सुरक्षेचा मुद्दा,विमानात तांत्रिक अडचणी..पण कर्मचाऱ्यांची कमतरता आणि शेड्युलिंगमधील अडचणींमुळे इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइट्स  रद्द होत आहेत .आम्ही तुम्हाला 2024 मध्ये सर्वाधिक रद्द झालेल्या टॉप 10 एअरलाईन्सबद्दल सांगणार आहोत. विशेष म्हणजे या यादीत इंडिगोच्या नावाचा समावेश नाहीय. 

Cirium ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, इंडिगो अलीकडच्या दिवसांत चालक दलाच्या मोठ्या कमतरतेचा सामना करत आहे. यामुळे इंडिगोच्या अनेक फ्लाइट्स आज पाचव्या दिवशीही रद्द करण्यात आल्या आहेत.खरंतर,उड्डाण ड्युटीची मर्यादा ठरवणारे नवीन FDTL नियम लागू झाल्यापासूनच एअरलाईनला चालक दलाच्या संख्येत कमतरतेचा सामना करावा लागत आहे.

नक्की वाचा >> 4 स्टार हॉटेलच्या रुममध्ये CCTV, कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ रेकॉर्ड केला! 'त्याने' डोळ्यादेखत पाहिलं अन्..

नवीन नियमांमध्ये पायलटसाठी साप्ताहिक विश्रांतीचा वेळ वाढवण्यात आला होता आणि रात्री विमानांच्या लँडिंगची संख्या मर्यादित करण्यात आली होती. जेणेकरून उड्डाण सुरक्षेला बळकटी मिळेल.मात्र इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीमुळे FDTL नियम लागू मागे घेण्यात आले आहेत.

Advertisement
एअरलाईनचे नाव कोणत्या देशाची आहे रद्द दर
डाना एअर  नायजेरिया  33.9%
लायन एअर एशिया  इंडोनेशिया 16.7%
विंग्स एअर एशिया इंडोनेशिया 16.3%
एअर ऑस्ट्रल मिडल ईस्ट फ्रान्स 14.9%
चोंगकिंग एअरलाईन्स चीन 14.8%
सुपर एअर जेट एशिया पॅसिफिक इंडोनेशिया 14.7%
एअर सेशेल्स सेशेल्स 10.1%
बाटिक एअर इंडोनेशिया 9.4%
चायना एक्सप्रेस एअरलाईन्स चीन 7.7%

नक्की वाचा >> Video: सिगारेटच्या लायटरने अगरबत्ती-दिवा पेटवायचा की नाही? भक्ताच्या प्रश्नाला अनिरुद्धाचार्याचं भन्नाट उत्तर