Maha Kumbh Mela Traffic : वाहतूक कोंडीमुळे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत, सुनावण्या पुढे ढकलल्या

जाहिरात
Read Time: 3 mins
प्रयागराज:

Kumbh Mela traffic affects Allahabad High Court : कुंभ मेळ्यामध्ये उत्तर प्रदेशच्या प्रयागराजकडे येणारे सर्व रस्ते हे जाम (Kumbh Mela Massive Jam) झाले आहेत. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 300 किलोमीटरपर्यंतच्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे (Katni Highway Traffic Problem) . फक्त उत्तर प्रदेशच नाही तर आजूबाजूच्या राज्यांनाही या वाहतूक कोंडीची झळ सहन करावी लागत आहे. माघी पौर्णिनेला (Magh Purnima) माघ महिना संपत असल्याने त्यापूर्वी पवित्र स्नान करण्यासाठी लोकं प्रयागराजच्या दिशेने निघाली आहेत. यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीचा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या कामकाजावरही (Allahabad High Court) परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. वकील कोर्टात पोहोचू न शकल्याने अनेक सुनावण्या पुढे ढकलण्यात आल्या.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर अल्ट न्यूजचे पत्रकार आणि फॅक्ट चेकर मोहम्मद झुबेर यांनी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी आली होती. झुबेर यांनी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द केला जावा अशी मागणी केली आहे. गाझिबायाबदच्या दासनातील देवीच्या मंदिराचे पुजारी असलेल्या यती नरसिंहानंद यांनी झुबेर यांच्याविरोधात तक्रार केली होती, ज्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला होता. समाजात तेढ निर्माण केल्याचा झुबेर यांच्यावर आरोप करण्यात आला होता. न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि न्यायमूर्ती योगेंद्र कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होती. ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले. एका वकिलाने याबाबत बोलताना म्हटले की, न्यायालयाने आज कोणत्याही प्रकरणात आम्ही आदेश देणार नाही, कारण आज वाहतूक कोंडी असून त्यामुळे अनेकजण कोर्टात पोहचू शकलेले नाहीत असे जाहीर केले होते. वाहतूक कोंडीमुळे न्यायालयाने कोणताही आदेश पारीत करू नये अशी विनंती बार असोसिएशनतर्फे करण्यात आली होती. 

Advertisement

नक्की वाचा : महाकुंभासाठी जाणाऱ्यांनी इकडं लक्ष द्या! कुठं आहे ट्रॅफिक जाम? वाचा सर्व अपडेट

झुबेर यांच्या प्रकरणाप्रमाणेच अन्य प्रकरणांमध्येही न्यायालयाने कोणताही आदेश न देता सुनावणी पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले. न्यायालयाने वकिलांसाठी ऑनलाईन सुनावणीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठीच्या वेबएक्स लिंकही देण्यात आलेल्या आहेत, मात्र याचा वापर करण्यात आला नाही. 

Advertisement

मध्य प्रदेशातील कटनी ते उत्तर प्रदेशातील प्रयागराजला जोडणाऱ्या मार्गावर 300 किलोमीटरचा जाम लागला आहे. पोलिसांनी पुढे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कटनीहून वाहनांना परत पाठवण्यास सुरूवात केली आहे. या वाहतूक कोंडीत महिला, ज्येष्ठ नागरीक, लहान मुले अडकली आहेत. त्यांना मदत करण्यासाठी या मार्गावरील गावकरी पुढे आले असून त्यांनी या लोकांसाठी पाणी आणि खाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांना परत फिरण्यास सांगितले असता त्यांनी यास नकार दिला आहे. आम्ही काहीही झालं तरी कुंभ मेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी जाणारच असा निर्धार अनेकांनी बांधला आहे. कितीही त्रास झाला तरी चालेल मात्र आम्ही कुंभ मेळ्याला जाणार असं या भाविकांचे म्हणणे आहे. 
 

Advertisement