Trending News: पळाला नाही तर नडला! घनदाट जंगलात 13 वर्षाचा प्रभात 2 अस्वलांना भीडला, 4 मिनिटांचा थरार

अन्नाच्या शोधात जंगली प्राणी वारंवार निवासी भागात येत आहेत. यापूर्वी कटक येथे एका तरुणाने वाघाचा सामना केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील १३ वर्षांच्या प्रभातने दोन हिंस्र अस्वलांशी धैर्याने लढा दिला आहे
  • प्रभात शाळेतून घरी परतताना जंगलात अस्वलांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला तो गंभीर जखमी झाला आहे
  • प्रभातने चार मिनिटे अस्वलांशी संघर्ष करत त्यांना पळवून लावले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

काही मुलं अशी असतात की त्याच्या धैर्याने सर्वच जण आवाक होतात. मुर्ती लहान पण किर्ती महान असचं त्यांच्याबाबत बोललं जातं. अंगावर शहारे आणणारी अशीच शौर्याची एक घटना समोर आली आहे. ओडिशाच्या नीलगिरी भागातील एका 9 वीत शिकणाऱ्या मुलाने चक्क दोन हिंस्त्र अस्वलांशी निकराची झुंज दिली. ऐवढेच नाही तर स्वतःचे प्राण वाचवत त्या दोन्ही अस्वलांना पळवून लावले. त्याच्या या धैर्याचे सर्वत्र कौतूक होत आहेत. पण सर्व जण आश्चर्यचकीत ही झाले आहेत. 

प्रभात असे त्या मुलाचे नाव आहे. तो 13 वर्षाचा आहे. त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात तो राहतो. प्रभात सायंकाळच्या वेळी जवळच्या गावातून आपल्या घरी परतत येत होता. त्याच्या अजूबाजूला जंगल आहे. त्या जंगलात झुडपात दोन अस्वल दबा धरून बसले होते. प्रभात समोर येताच त्या  दोन अस्वलांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्लाने प्रभात थोडा दचकला. पण वेळीच तो सावरला. त्याने ही मग मागे पुढे न पाहाता अस्वलांसमोर उभा ठाकला.  

नक्की वाचा - Budget 2026: काय स्वस्त? काय महाग? दारू महागली, विमानाचे पार्ट स्वस्त, पाहा संपूर्ण लिस्ट

स्वतःचा बचाव करण्यासाठी मी जवळपास 3-4 मिनिटे त्यांच्याशी लढत होतो, असे प्रभातने सांगितले. निशस्त्र असूनही त्याने हार मानली नाही. अखेर प्रभातच्या प्रतिकारामुळे अस्वलांनी तिथून पळ काढला. या हल्ल्यात प्रभात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नीलगिरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरूवातील आपण घाबरलो पण नंतर मात्र त्या अस्वलांना पळवून लावले असंही त्याने यावेळी सांगितलं.मानवी वस्तीत वन्यजीवांचा वाढता वावर हा सध्या ओडिशामध्ये चिंतेचा विषय बनला आहे. त्याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल. 

नक्की वाचा - Budget 2026 Women: बजेटमध्ये घोषीत केलेलं SHE-Marts काय आहे? कुणाला अन् कसा होणार फायदा?

हा थरार सायंकाळच्या सुमारास घडला. शाळेतून घरी परतताना अस्वलांनी प्रभातचा रस्ता अडवला आणि त्याच्यावर तुटून पडले. प्रभातने आरडाओरडा करण्याऐवजी पूर्ण ताकदीनिशी त्यांचा मुकाबला केला. त्याच्या प्रखर प्रतिकारामुळे दोन्ही अस्वले जंगलाच्या दिशेने पळून गेली. या भीषण संघर्षात प्रभात गंभीर जखमी झाला आहे, मात्र डॉक्टरांनी तो धोक्याबाहेर असल्याचे सांगितले आहे. अन्नाच्या शोधात जंगली प्राणी गावांकडे वळत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नाच्या शोधात जंगली प्राणी वारंवार निवासी भागात येत आहेत. यापूर्वी कटक येथे एका तरुणाने वाघाचा सामना केला होता, आता प्रभातच्या या धाडसी कृत्याची तुलना त्या घटनेशी केली जात आहे. 

Advertisement