- उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील मुन्नी देवीने आपल्या मुलाच्या वयाच्या तरुणाशी लग्नाचा निर्णय घेतला आहे
- मुन्नी देवी यांना पाच मुले असूनही त्यांनी निखिल नावाच्या तरुणाशी प्रेम करून विवाह केला आहे
- मुन्नी देवी आणि निखिल यांचा विवाह हिंदू रितीनुसार आलापूर परिसरातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात पार पडला
प्रेमाला वय नसतं असं म्हणतात तेच खरं. अशी अनेक उदाहरण आपण पाहीली आहेत. वृद्ध पती अन् तरूण पत्नी यांची लग्न लागलेली पाहीली गेली आहेत. पण पाच मुलांच्या आई आपल्या मुलांच्या वयाच्या मुलाच्या प्रेमात पडली असे तर? बरं त्या ही पुढे जावून त्याच्या सोबत लग्न केलं असेल तर? बरं असं ही नाही की तिच्या नवरा नाही. नवरा असतानाही असं करण्याचं धाडस एका महिलेने केलं आहे. तुम्हाला विश्वास पटणार नाही. पण अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व होत असताना नवरा मात्र हतबल झाला होता. तो उघड्या डोळ्याने हे सर्व पाहण्या शिवाय काही करू शकत नव्हता.
उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात प्रेमाची बंधनं आणि सामाजिक नियम मागे सारून एका महिलेनं मोठा निर्णय घेतला आहे. मुन्नी देवी ही जहांगीरगंजमधील हुसेनपूर खुर्द गावात राहते. तिला पाच मुलं आहेत. असं असताना ती आपल्या मुलाच्या वयाच्या निखिल नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. दोघेही प्रेमात असे काही वेडे झाली की त्यांनी कोणताही विचार न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रेम खरंच आंधळं असतं, या विचाराला पुष्टी देणारी ही घटना आहे.
मुन्नी देवीची प्रियकर ही जहांगीरगंज परिसरात राहत होता. त्याचं नाव निखिल असं होतं. तो भंगार खरेदीसाठी देवरिया येथे गेला होता. देवरियातील भटनी परिसरात भंगार गोळा करणाऱ्या निखिलची मुन्नी देवींशी भेट झाली. पुढे त्यांची नेहमीच भेट होवू लागली. या नियमित भेटीचे रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झालं. विशेष म्हणजे निखिलचं वय मुन्नी देवींच्या सर्वात मोठ्या मुलाच्या वयाच्या जवळपास आहे. पण प्रेमात तिला काही दिसत नव्हतं. ती प्रेमात आंधळी झाली होती. या प्रेमसंबंधाची माहिती कुटुंबाला मिळाली. त्यानंतर घरात मोठा गदारोळ झाला. पती आणि नातेवाईकांनी सामाजिक दबावाचं कारण देत मुन्नी देवींवर हे नातं तोडण्यासाठी दबाव आणला.
मात्र, मुन्नी देवींनी आपला निर्णय बदलला नाही. निखिलसोबतच आयुष्य व्यतीत करणार असल्याचं तिने स्पष्ट केलं. मुन्नी देवी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यानंतर आलापूर परिसरातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात दोघांनी हिंदू रितीरिवाजानुसार विवाह केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या विवाह सोहळ्याला मुन्नी देवींचे पहिले पतीही उपस्थित होते. दुसऱ्या व्यक्तीसोबत पत्नीचा विवाह होताना पाहून पहिले पती भावूक झाला होता. त्यांने दुःखी मनाने प्रतिक्रिया दिली की, “जेव्हा ती माझ्यासोबत राहू इच्छित नाही, तर मी तिला जबरदस्तीने कसं थांबवू?” विवाहानंतर ते आपल्या 5 मुलांना घेऊन घरी परतले.