- काँग्रेस खासदार रेणूका चौधरी यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत भटक्या कुत्र्याला आणले.
- रेणूका चौधरींनी कुत्रा संसदेत का आणला याचे स्पष्टीकरण देताना नियम आणि शिष्टाचार यावर प्रश्न उपस्थित केला.
- भाजपच्या खासदारांनी रेणूका चौधरींच्या या कृतीवर संसद भवनाचा अपमान असल्याचा आक्षेप घेतला आहे.
रामराजे शिंदे
संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाली. अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवस गाजला तो संसद परिसरात आलेल्या कुत्र्याचा. हा कुत्रा भटकत आला नव्हता, तर त्याला चक्क एक खासदार घेवून आल्या होत्या. हा कुत्रा त्यांचा पाळीव कुत्रा ही नव्हता तर तो भटका कुत्र होता असं त्यांनीच सांगितलं. कुत्रा संसद भवनात का आणला याबाबत विरोधकांनी विचारलं असता त्यावर त्या खासदारांनी नियमावर बोट ठेवलं. शिवाय काय शिष्टाचार आहे याची ही विचारणा केली. मात्र त्यांच्या या कृत्यामुळे त्या अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.
या खासदार काँग्रेसच्या रेणूका चौधरी या आहेत. रेणूका चौधरी या काँग्रेसच्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. त्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत भटक्या कुत्र्याला घेऊन आल्या होत्या. त्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्या आपल्या कार मधून कुत्रा घेऊन संसदेत आल्या होत्या. कुत्रा हा मुका प्राणी आहे. तो चावत नाही. “जे चावतात ते संसदेत बसलेले आहेत, असं वक्तव्य रेणुका चौधरी यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यत आहे.
कुत्रा संसदेत आणण्याचे त्यांनी समर्थनही केले आहे. त्यांच्या विधानावर भाजप खासदारांनी आक्षेप घेतला आहे. हा खासदारांचा आणि संसद भवनाचा अपमान असल्याचे भाजपने म्हटले आहे. त्यावर रेणूका चौधरी यांनी कुत्रा संसदेत आणण्याबद्दल "कोणता शिष्टाचार किंवा काही नियम आहे का?" असा सवाल विरोधकांना केला आहे. आपण कुत्रा संसद भवनात का आणला याचं ही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवाय त्या मागची आपली भूमीका ही त्यांनी स्पष्ट केली आहे.
नक्की वाचा - Pune News: 5 डिसेंबरला राज्यातल्या शाळा बंद राहणार, शाळा बंद ठेवण्याचं कारण काय?
त्या म्हणाल्या की “मी संसद भवनात येत होते. मला हा कुत्रा दिसला. मला भीती वाटत होती की कदाचित त्याचा अपघात होईल. मी त्याला उचललं आणि गाडीत घेऊन आले. त्यानंतर मी तो घरी पाठवला. एखाद्याचा जीव वाचवण्यास कोणी कसा आक्षेप घेऊ शकतो?" असंही रेणुका चौधरी म्हणाल्या. पण चावणारे तर आत बसले आहेत हे वक्तव्य करून त्यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय कुत्रा संसदेत आला याची चर्चाही परिसरात चांगली रंगली होती.