मुंबई:
Ahmedabad Plane Crash News : भारतीय विमान वाहतुकीच्या इतिहासात 12 जून 2025 हा काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. हा अपघात झाला त्यावेळी विमानात 232 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर होते.
हा अपघात इतका भयानक होता की त्यामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. अहमदाबादच्या पोलीस संचालकांनी देखील ही भीती व्यक्त केली होती. पण, त्याचवेळी चमत्कार घडला आहे. या अपघातामध्ये दोन प्रवासी बचावले आहेत. ANI या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.
Advertisement
रमेश विश्वास कुमार असं या अपघातामध्ये वाचलेल्या एका प्रवाशाचं नाव आहे. ते या विमानात 11 A या सीटवर बसले होते. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा अनुभव त्यांना आला आहे.
बातमी अपडेट होत आहे