Pakistani spy: पाकिस्तानचे आणखी 2 गुप्तहेर गजाआड, धक्कादायक माहिती ATS च्या हाती

नवी दिल्ली येथील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी मुजम्मल हुसैनला भारत सरकारने देश सोडण्याचा आदेश दिला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नोएडा आणि वाराणसी येथे वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन व्यक्तींना अटक केली आहे. या व्यक्तींवर बेकायदेशीर व्हिसा मिळवून देण्यासाठी पैसे उकळणे आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. एटीएसने जारी केलेल्या निवेदनानुसार, दिल्लीतील सीलमपूर येथील रहिवासी मोहम्मद हारून (45) याला गुरुवारी नोएडा येथून अटक करण्यात आली. हारूनवर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एटीएस उत्तर प्रदेशला अशी माहिती मिळाली होती की, भंगारचे काम करणारा हारून, पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी मुजम्मल हुसैन याच्यासोबत मिळून पाकिस्तानचा व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली अवैधपणे पैसे गोळा करत होता. तसेच, तो मुजम्मलसोबत सुरक्षा विषयक माहिती शेअर करून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता. एटीएसच्या तपासात असे समोर आले आहे की, हारून मुजम्मल हुसैन नावाच्या व्यक्तीच्या सतत संपर्कात होता. तो पाकिस्तानी नागरिक असून नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करतो. 

ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagawane: 7 दिवस 11 गावं 2 गाड्या, हगवणे बाप-लेकाने पोलिसांच्या नाकावर टिच्चून काय काय केले?

एटीएसच्या म्हणण्यानुसार, हारूनच्या चौकशीतून असे उघड झाले की त्याचे पाकिस्तानात नातेवाईक आहेत. त्यामुळे तो पाकिस्तानात ये-जा करत असताना पाकिस्तान उच्चायुक्तालयात मुजम्मल हुसैनच्या संपर्कात आला. मुजम्मल हुसैनच्या सांगण्यावरून हारूनने अनेक बँक खाती उघडली होती.  मुजम्मल हुसैनने पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात लाच घेत असे. ते पैसे तो या बँक खात्यात जमा करत असेत. पुढे हारून काही कमिशन घेऊन हे पैसे मुजम्मलने सांगितलेल्या ठिकाणी किंवा व्यक्तीला रोख स्वरूपात देत असे, ज्याचा वापर देशविरोधी कारवायांमध्ये केला जात होता. हे तपासात उघड झाले. 

ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai News: चमत्कार! 15 मिनिटे हृदय बंद, तरीही जीव वाचला, हे कसं शक्य झालं?

नवी दिल्ली येथील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी मुजम्मल हुसैनला भारत सरकारने देश सोडण्याचा आदेश दिला आहे. हारूनविरुद्ध एटीएस पोलिस ठाण्यात संबंधित कलमांतर्गत एफआयआर दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन आणि 16 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एटीएसने वाराणसीमध्ये अशीच कारवाई करून आणखी एका संशयिताला अटक केली आहे. तो वाराणसी जिल्ह्यातील जैतपुरा पोलिस ठाण्याच्या दोशीपुरा येथील रहिवासी आहे. त्याचे नाव तुफैल आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Tamannaah Bhatia: तमन्ना म्हैसूर सँडल साबणाची झाली ब्रँड ॲम्बेसेडर, पण कर्नाटकात उफाळला वाद, कारण काय?

तुफैल अनेक पाकिस्तानी व्यक्तींच्या संपर्कात होता. प्रतिबंधित पाकिस्तानी दहशतवादी संघटना तहरीक-ए-लब्बैक चा नेता मौलाना शाद रिझवी याचे व्हिडिओ तो नेहमी शेअर करत होता.'एटीएस सूत्रांनी सांगितले की, तुफैल 600 हून अधिक पाकिस्तानी लोकांशी संपर्कात होता. त्यात फैसलाबाद येथील नफीसा नावाच्या महिलेचाही समावेश आहे. तिचा पती कथितपणे पाकिस्तानी सैन्यात अधिकारी आहे. एटीएसने सांगितले की, तुफैलला गुरुवारी वाराणसी येथील आदमपूर येथून अटक करण्यात आली.