Modi Cabinet Decisions: देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथचं दर्शन घ्यायची अनेकांची इच्छा असते. पण, अनेकजण तेथील खडतर प्रवासामुळे तिथं जाण्याबाबत एकदा तरी फेरविचार करतात. कारण, सोनप्रयागहून केदरानाथला जाण्यासाठी तब्बल 8 ते 9 तास लागतात. आता हा त्रास कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केदारनाथ आणि हेमकुंड रोप-वे (Kedarnath Rope-way) योजनेला मान्यता देण्यात आली आहे. हा रोप-वे झाल्यानंतर केदारनाथ आणि हेमकुंड साहिबला जाणं सोपं होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय रोप-वे विकास कार्यक्रम-पर्वतमाला परियोजनेनुसार उत्तराखंडमधील सोनप्रयागहून केदारनाथपर्यंत (12.9 किमी) रोपवे योजनेच्या विकासाला मान्यता दिली आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागिदारीमधून ही योजना पूर्ण केली जाणार आहे.
केदारनाथमध्ये बांधला जाणारा हा रोपवे सर्वात प्रगत ट्राय-केबल डिटेचेबल गोंडोला (3S) तंत्रज्ञानावर आधारित असेल. त्यामध्ये रोज 1800 प्रवासी प्रवास करु शकतील. ही योजना केदारनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी वरदान असेल. कारण त्यांना आरामात ही यात्रा करता येईल. यापूर्वी या मार्गावरील एका मार्गाच्या प्रवासासाठी 8 ते 9 तास लागत होते. आता हा प्रवास जवळपास 36 मिनिटांमध्ये पूर्ण होईल.
( नक्की वाचा : Mahakubh Mela 2025 : 45 दिवसांत बोटचालकांची छप्परफाड कमाई, IIT - IIM वाल्यांनाही येईल चक्कर )
केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयांबाबत माहिती देताना वैष्णव यांनी सांगितलं की, 'राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम - पर्वतमाला प्रकल्पाअंतर्गत उत्तराखंडमधील गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी या 12.4 किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाच्या विकासाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.'
गोविंदघाट ते हेमकुंड साहिबजी पर्यंत 12.4 किमी लांबीचा रोप-वे प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) माध्यमातून 2,730.13 कोटी रुपये भांडवली खर्चासह विकसित केला जाईल.
सध्या गोविंदघाटापासून हेमकुंड साहिबपर्यंतचा प्रवास हा 21 किलोमीट आहे. तो अत्यंत आव्हानात्मक चढ असल्यानं पायी किंवा पालखीनं पूर्ण करावा लागतो. हेमकुंड साहिब जीला भेट देणाऱ्या यात्रेकरू आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी प्रस्तावित रोपवेची योजना करण्यात आली आहे.