भाजपाला पाठिंबा दिला म्हणून दलित तरुणीची हत्या, मतदानाच्या दिवशी धक्कादायक घटना

उत्तर प्रदेशातील करहल पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला मत न देणं दलित तरुणीला महाग पडलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांसह उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक बुधवारी (20 नोव्हेंबर) झाली. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. उत्तर प्रदेशातील करहल पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला मत न देणं दलित तरुणीला महाग पडलं. या तरुणीची मैनपुरीमध्ये एका सपा समर्थकानं हत्या केली असा आरोप आहे. या तरुणीनं भाजपाला मत देणार असं सांगितलं होतं, त्यामुळे ही हत्या झाली असा आरोप आहे. 

काय आहे प्रकरण?


या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रशांत यादव आणि त्याचा आणखी एक सहकारी करहलमधील दुर्गा या तरुणीवर समाजवादी पक्षाला मतदान करण्यासाठी दबाव टाकत होता. या तरुणीनं त्याला ठाम नकार दिला. त्यानंतर प्रशांत यादवनं त्याच्या मित्राला सोबत घेऊन तरुणीला त्याच्या घरी नेलं. तिला घरामध्ये नशेचे पदार्थ खाऊ घातले. त्यानंतर बेदम मारहाण करत तिची हत्या केली. 

भाजपा नेते भूपेंद्र सिंह चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. करहलमध्ये भाजपा सरकारच्या कल्याणकारी योजनांची लाभार्थी असलेल्या एका दलित मुलीला समाजवादी पक्षाच्या प्रशांत यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हत्या केली. दलित तरुणीनं भाजपाला मतदान करणार असल्याचं सांगितलं होतं, त्यामुळे तिची हत्या झाली, असा आरोप त्यांनी केला. 

मृतदेह गोणीत गुंडाळून पाण्यात टाकला

या तरुणीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह गोणीत गुंडाळून पाण्यात फेकला. मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे. आरोपी प्रशांत तरुणीवर समाजवादी पक्षाला मतदान करण्यासाठी दबाव टाकत होता. तो मंगळवारी तिला घरी घेऊन घेला. त्यानं पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Maharashtra Exit Polls 2024 : महाराष्ट्रात कुणाचं सरकार? पाहा काय सांगतात एक्झिट पोल )
 

या प्रकरणात कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारानंतर आरोपी प्रशांत यादव आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. तर मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी मैनपूरीमध्ये पाठवण्यात आलाय. 

Topics mentioned in this article