USA H-1B Visa: अमेरिकेला सोडा आता 'हे' 5 देश आहेत वर्क व्हिसासाठी चांगले पर्याय, मिळेल बक्कळ पगार

अमेरिकेने H-1B व्हिसासाठी 1 लाख डॉलर्स फी लागू केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमेरिकेने एच-1बी व्हिसासाठी मोठे शुल्क लागू केल्यामुळे भारतीय कुशल कामगार आता अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांचा विचार करत आहेत. अमेरिकेतील या व्हिसासाठी आता 1 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 88 लाख रुपये इतका मोठा खर्च येणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेत नोकरी करणे परदेशी कामगारांसाठी खूप महागडे झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय व्यावसायिकांसाठी उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध असलेले 5 पर्यायी देश खालीलप्रमाणे आहेत. तिथे सहज वर्क व्हिसातर मिळेलच पण बक्कळ पगारही मिळेल. 

उत्तम संधी असलेले 5 देश

कॅनडा: 
अमेरिकेचा शेजारी असलेल्या कॅनडामध्ये कुशल कामगारांसाठी फेडरल स्किल्ड वर्कर प्रोग्राम (FSWP) उपलब्ध आहे. यामुळे आयटी व्यावसायिकांना व्हिसा सहज मिळतो. येथे कायमस्वरूपी निवासस्थान मिळवणे तुलनेने सोपे आहे.

जर्मनी: 
युरोपचे प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या जर्मनीत उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षेत्रात भरपूर संधी आहेत. या देशाचा जॉब सीकर व्हिसा सहा महिने राहण्याची परवानगी देतो. जो नंतर वर्क व्हिसात बदलता येतो. EU ब्लू कार्डमुळे कुशल कामगारांना नोकरी शोधणे इथे सोपे होते.

सिंगापूर: 
आशियातील या महत्त्वाच्या देशात रोजगार पास (EP) द्वारे व्हिसा मिळतो. येथील प्रक्रिया साधी असून बँकिंग, आयटी आणि मार्केटिंग क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे यादेशाकडे ही अनेकांचा कल आहे. 

Advertisement

युएई (UAE): 
युएईमध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील उत्पन्न आयकरमुक्त (Tax-Free) असते. आयटी, आरोग्यसेवा आणि बांधकाम या क्षेत्रात या देशात चांगल्या संधी आहेत. इथले पगार ही जगातील सर्वात चांगले मानले जातात. 

ऑस्ट्रेलिया: 
उच्च जीवनमानासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियात जनरल स्किल्ड मायग्रेशन (GSM) आणि तात्पुरत्या कौशल्य कमतरता व्हिसाद्वारे आयटी, अभियांत्रिकी आणि आरोग्यसेवा क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळतात. इथे ही मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आहेत. 

Advertisement

अमेरिकेने H-1B

व्हिसासाठी 1 लाख डॉलर्स फी लागू केली आहे. यामुळे परदेशी वर्कर्सना खास करून भारतीयांना अमेरिकेत नोकरी मिळवणे महाग आणि कठीण झाले आहे. त्यामुळे  अनेकांना पर्यायी देशांचा विचार करावा लागत आहे. अशा वेळी कॅनडा, जर्मनी, सिंगापूर, युएई आणि ऑस्ट्रेलिया हे देश भारतीय कुशल कामगारांसाठी उत्तम पर्याय निश्चितच ठरू शकतात. कॅनडामध्ये व्हिसा आणि कायमस्वरूपी राहणे सोपे आहे. जर्मनीत जॉब सीकर व्हिसा आणि EU ब्लू कार्ड उपलब्ध आहे. सिंगापूरची व्हिसा प्रक्रिया सुलभ आणि पगार चांगला आहे. तर युएईमध्ये आयकर नाही आणि व्हिसा प्रक्रिया सोपी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये  कौशल्य व्हिसा दिला जातो.