ध्यानीमनी नसताना अचानक जर कुणी करोडपती होत असेल तर? हे फक्त स्वप्नात होतं, किंवा एखाद्या गोष्टीत होतं. पण अशी घटना प्रत्यक्षातही घडली आहे. एका शेतकऱ्याच्या लेकाचं नशिब रातोरात फळफळलं. नुसतं फळफळं नाही तर त्याल छप्पर फाडके मिळालं. या पठ्ठ्याने फक्त 39 रुपयांच्या बदल्यात तब्बल 4 कोटी जिंकण्याची कामगिरी केली आहे. मंगल सरोज असं या तरुणाचं नाव आहे. चार कोटी जिंकणं हे त्याच्यासाठी स्वप्नासारखं होतं. त्याला अजूनही आपण चार कोटी जिंकलो आहोत यावर विश्वास बसत नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंगल सरोज हा उत्तर प्रदेशातल्या कौसंबी जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावातील रहिवाशी आहे.त्याचे वडील हे शेतकरी आहेत. गावात त्याचं अगदी छोटं घर आहे. मेहनत करुन रोजचा दिवस काढायचा अशी घरची स्थिती आहे. अशा या मंगलला ड्रिम 11 वर टीम लावण्याची सवय होती. त्यात तो 39 रुपयांची टीम लावत होता. पण त्याला बक्षिस जिंकण्यात यश आलं नव्हतं. जवळपास 77 वेळा तो अपयशी ठरला होता.
29 एप्रिलला पंजाब आणि चेन्नई ही आयपीएलची मॅच होती. त्या मॅचवर त्याने 39 रुपयांची टीम लावली होती. जशी मॅच संपली तसं त्या रात्रीत मंगलचं नशिब ही चमकलं. त्याचं नशिब फळफळलं. त्याला चक्क एक दोन नाही तर चार कोटींची लॉटरी लागली होती. तो ड्रिम 11 ची स्पर्धा जिंकला होता. तो खडेखडे करोडपती झाला होता. त्याला त्याच्यावर विश्वासच पटत नव्हता. या चार कोटी पैकी त्याला 2 कोटी 80 लाख रूपये मिळणार आहेत. 30 टक्के टॅक्स कट करून त्याला ही रक्कम दिली जाणार आहे.
मंगल ड्रिम 11 वर चार कोटी जिंकल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर त्याचे अभिनंदन करण्यासाठी गावातले सगळेच जण त्याच्या घरी धडकले. त्याच्या घरच्यांचा आनंद तर गगनात मावेना झाला होता. गेल्या काही दिवसापासून आपल्याला स्वप्न पडत होते. त्यात आपण करोडपती होणार असं दिसत होतं असं मंगल सांगतो. हे पैसे आपण बिझनेसमध्ये लावणार असल्याचं त्याने सांगितले. चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार ही मंगल करत आहेत. ड्रिम 11 या खेळात जोखीम आहे. त्यामुळे असे खेळ खेळण्यासाठी एनडीटीव्ही मराठी कुणालाही प्रोत्साहन देत नाही.