Vande Mataram : ना सोशल मीडिया, ना इंटरनेट; मग 100 वर्षांपूर्वी 'वंदे मातरम्' इतक्या वेगाने कसे झाले Viral?

Vande Mataram Story : सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी डिजिटल माध्यम नसतानाही 'वंदे मातरम्' हे गीत लाखो भारतीयांच्या मनात इतक्या वेगाने कसे पोहोचले, ही खरोखरच अचंबित करणारी गोष्ट आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Vande Mataram : हे गीत इतके प्रभावी आणि भावनिक होते की, ते ब्रिटिश सत्तेसाठी धोकादायक ठरले.
मुंबई:

Vande Mataram Story : आज सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जगात एखादी गोष्ट 'व्हायरल' होणे ही सामान्य बाब आहे, पण सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी डिजिटल माध्यम नसतानाही 'वंदे मातरम्' हे गीत लाखो भारतीयांच्या मनात इतक्या वेगाने कसे पोहोचले, ही खरोखरच अचंबित करणारी गोष्ट आहे.

बंगालच्या फाळणीने पेटलेल्या 1905 च्या दशकात, एका गाण्याने ब्रिटिश सत्तेच्या काळजात धडकी भरवली होती. ब्रिटिशांच्या एका निर्णयामुळे बंगालमध्ये उद्रेक झाला आणि याच उद्रेकात 'स्वदेशी'ची हाक 'स्वराज्य'च्या घोषणेत बदलली. या आंदोलनाचे हृदय बनले 'वंदे मातरम्' हे तेजस्वी गीत.

रेकॉर्डिंगने उडवली होती ब्रिटिशांची झोप

हे गीत इतके प्रभावी आणि भावनिक होते की, ते ब्रिटिश सत्तेसाठी धोकादायक ठरले. कलकत्त्यात हेमेंद्र मोहन बोस नावाचे एक व्यक्ती रेकॉर्डिंगच्या क्षेत्रात काम करत होते. ज्यांना आज आपण HMV नावाने ओळखतो. ब्रिटिश सरकार राजद्रोहाचा गुन्हा दाखल करू शकते, या धोक्याची जाणीव असतानाही हेमेंद्र मोहन बोस यांनी हे गीत 78 RPM डिस्कवर रेकॉर्ड करण्याचा धाडसी निर्णय घेतला.हे गीत डिस्कवर रेकॉर्ड झाली, की त्यांची 'आवाज' एका ठोस रूपात देशभर घुमू लागली आणि ब्रिटिश सत्तेच्या विरोधात भावना अधिक तीव्र होऊ लागल्या.

( नक्की वाचा : Ram Mandir : राम मंदिरावरील ध्वजात दडलंय काय? PM मोदींनी सांगितले 13 'शक्तीशाली' अर्थ, वाचून वाटेल अभिमान )

पोलिसांनी फोडले रेकॉर्ड्स, पण...

या गाण्याचा वाढता प्रभाव पाहून ब्रिटिश पोलिसांनी त्वरीत कारवाई सुरू केली. त्यांनी हेमेंद्र मोहन बोस यांच्यावर छापे टाकले, रेकॉर्डिंग मशीन्स तोडल्या, गाण्याच्या मास्टर डिस्क नष्ट केल्या आणि उर्वरित रेकॉर्डिंगचे साठे जप्त केले. अनेक दुकाने सील करून दरवाजे बंद करण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या गाण्यानं प्रज्ज्वलित झालेली ज्योत आता केवळ भारतात मर्यादित नव्हती.

Advertisement

फ्रान्स आणि बेल्जियममध्येही प्रसार

ब्रिटिश पोलिसांच्या हल्ल्यादरम्यान काही मास्टर रेकॉर्ड्स अत्यंत गुप्तपणे भारताबाहेर, युरोपमध्ये पोहोचले होते. हे रेकॉर्ड्स फ्रान्स आणि बेल्जियममधील 'Pathé Frères' नावाच्या कंपनीपर्यंत पोहोचले. ब्रिटिशांच्या हद्दीतून बाहेर असल्याने, या कंपनीने निर्भयपणे या रेकॉर्ड्सच्या नवीन प्रती तयार केल्या. त्यामुळे या 'वंदे मातरम्'च्या आवाजाला पुन्हा एकदा नवे मार्ग आणि नवी दिशा मिळाली आणि ब्रिटिश सरकार त्यांना थांबवू शकले नाही.

( नक्की वाचा : Trending News : अमेरिका आणि भारत इतके वेगळे!अमेरिकी आईनं जगाला सांगितले दोन देशांमधील 9 फरक, सर्वत्र चर्चा )

गुप्त मार्गाने पोहोचले कोट्यवधी लोकांपर्यंत

हे रेकॉर्ड्स रेल्वेच्या डब्यांतून, वसतिगृहांमधून, गुप्त बैठकांमधून, बाजारांमध्ये, कधी-कधी साध्या पिशव्यांमध्ये लपवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू लागले. जिथे कुठे हे गीत वाजवले जाई, तिथे आपोआप गर्दी जमे, लोकांच्या हृदयाचे ठोके वेगळे होत, त्यांच्यात संताप आणि क्रांतीची भावना जागृत होई. अशा प्रकारे, कोणताही डिजिटल आधार नसताना, सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी हे 'वंदे मातरम्' गीत एका संदेशाप्रमाणे जलद गतीने संपूर्ण देशात पसरले आणि 'व्हायरल' झाले, ज्यामुळे देशाचे राजकीय आणि सामाजिक स्वरूप बदलण्यास मदत झाली.

Advertisement
Topics mentioned in this article