Shark Tank Anupam Mittal: स्वित्झरलँड सोडा काश्मीर फिरा, स्वित्झरलँडपेक्षा काश्मीर किती तरी पटीने भारी आहे असं ट्वीट उद्योजक आणि शादी डॉट. कॉमचे प्रमुख अनुपम मित्तल यांनी केले आहे. ते आपल्या कुटुंबासह सध्या काश्मीर ट्रीपवर आहेत. त्यांनी या ट्रीपचे काही फोटो ही ट्वीट केले आहे. शिवाय त्या खाली त्यांनी स्वित्झर्लंडचा लक्झरी दौरा - 10 लाख रूपये, काश्मीरचा तसाच दौरा - 2 लाख रूपये. तुमच्याच देशातील अमर्याद सौंदर्य असं लिहीलं आहे. पण त्यांना यानंतर ट्रोल केलं जात आहे. असं असलं तरी अनुपमही त्यांना जशाच तसे उत्तर देत आहेत. त्यामुळे सध्या ट्वीटरवर टोलर्स आणि अनुपम मित्तल यांच्या शाब्दीक वॉर पाहायला मिळत आहेत.
अनुपम मित्तल यांनी काश्मीरला फिरण्यासाठी आग्रह धरला आहे. जास्त पैसे खर्च करून परदेशात जाण्या पेक्षा कमी पैशात तेवढचं सौंदर्य तुम्हाला काश्मीरला पाहाता येईल असं ते सांगत आहेत. तसं त्यांनी ट्वीटही केलं आहे. त्यानंतर टोलर्सनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली आहे. एक युजर्स म्हणतो की स्वित्झरलँडमध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या जात नाहीत. त्याला अनुपम मित्तल यांनीही जशाच तसे उत्तर दिले आहे. तुम्ही निट बोला. ही वेळ आपल्या देशाला सपोर्ट करण्याची आहे असं प्रत्युत्तर त्यांनी ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला दिलं आहे.
दुसऱ्या एका युजर्सने सांगितलं की, इन्फ्लुएंसर्सना अनेकदा पर्यटनाचा प्रचार करण्यासाठी पैसे दिले जातात. त्या बदल्यात त्यांना मोफत राहण्याचा आनंद मिळतो. परंतु सामान्य प्रवाशांसाठी वास्तव खूप वेगळे असते. भारतात नऊ दिवसांच्या प्रवासासाठी पायाभूत सुविधा खराब असूनही सहजपणे 3 लाख रुपये खर्च होऊ शकतात. या तुलनेत, तुम्ही चांगल्या पायाभूत सुविधांसह स्वित्झर्लंडचा अनुभव 4 लाख रुपयांमध्ये घेऊ शकता असं मित्तल यांना सुनावलं आहे. त्यावर काश्मीरमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत. जा आणि पाहा असं त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एक जण म्हणतो नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य खूप मौल्यवान आहे. तुम्हाला अनुपमसारखी सुरक्षा कदाचित मिळणार नाही. कल्पना करा आम्ही शांततेस सुट्टी घालवण्यासाठी जातो पण परत येत नाही असं म्हणत त्याने पहलगाम हल्ल्याची आठवण करून दिली आहे. त्यावर ही मित्तल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले मला सुरक्षा पुरवण्यात आली होती. पण ती स्वीकारली नाही. आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन काश्मीरला गेलो. काश्मीर आता पूर्णपणे सुरक्षित आहे. ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे असेल तर तिथे नक्की भेट द्या. दहशतवाद्यांना त्यांच्या कटात यशस्वी होऊ देऊ नका. भीती पसरवणे खूप सोपे असते. असं त्यांनी सांगितले आहे.
एकीकडे ते ट्रोल होत असताना दुसरीकडे मात्र अनुपम यांना अनेकांनी सपोर्ट केल्याचेही दिसत आहे. काश्मीर हे खरोखर खूप सुंदर आहे. तिथे नक्की गेलं पाहीजे असं ही काही जण म्हणत आहेत. तर काहींनी काश्मीर सुरक्षित असल्याचं ही म्हटलं आहे. तर काहींनी अनुपम यांनी काश्मीरला प्रमोट करण्याचं घेतलेल्या धोरणालाही पाठिंबा ही दिला आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटवर समिश्र प्रतिक्रीया उमटताना दिसत आहेत.