West Bengal CM Mamata Banerjee slips and falls : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा जखमी झाल्या आहेत. दूर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढताना त्यांना दुखापत झाली. त्या हेलिकॉप्टरमध्येच घसरुन पडल्या. पाय घसला आणि त्या खाली पडल्या. ममता बॅनर्जी दुर्गापूरहून आसनोलला प्रचारासाठी निघाल्या होत्या. सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ सावरलं. यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. ANI वृत्तसंस्थेनं या घटनेचा व्हिडिओ शेअर केलाय.
ममता बॅनर्जी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरामध्ये दुखापत झाली होती. त्या घरात फिरत असताना पडल्या आणि त्यांना दुखापत झाली. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यावेळी त्यांना दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. 2021 साली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही ममता बॅनर्जी जखमी झाल्या होत्या. नंदीग्राममध्ये प्रचाराच्या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये त्यांचं डोकं लोखंडाच्या खांबाला आदळलं होतं. हा भाजपाचा कट असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी नंतर केला होता. त्यानंतर त्यांनी काही काळ व्हिल चेअरवरुन विधानसभा निवडणुकीत प्रचार केला होता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पश्चिम बंगालमधील 42 लोकसभा मतदारसंघामध्ये 7 टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या दोन टप्प्यात 6 मतदारसंघातील मतदान पूर्ण झालंय. बंगलामध्ये सत्तारुढ तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात मुख्य लढत होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी आमने-सामने आले आहेत.