अमेरिकेत स्थापना, परदेशी भाविकांचाही ओढा; काय आहे हे ISKCON ?

कोलकात्यात जन्मलेले प्रभुपाद स्वामी हातात 40 रुपये आणि भगवान कृष्णाची काही पुस्तके घेऊन अमेरिकेतील बोस्टनला पोहोचले होते. त्यांनी तिथे वेळ मिळेल तेव्हा कृष्णाची प्रवचने उद्यानांमध्ये सांगण्यास सुरुवात केली.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी नवी मुंबईतील इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे (Sri Sri Radha Madanmohanji Temple of ISKCON)  उद्घाटन केले. यामुळे इस्कॉनचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. इस्कॉन (International Society for Krishna Consciousness) हे नाव अनेकांना परिचित असले, तरी त्याबद्दलची फारशी माहिती त्यांना नसते. भगवान श्री कृष्ण आणि भगवद्गी गीता,  जगाच्या कानाकोपऱ्यात  पोहचवण्याच्या उद्देशाने आणि कृष्ण जगाला कळावा यासाठी उभी करण्यात आलेली ही एक आध्यात्मिक चळवळ होती जिची स्थापना अमेरिकेत झाली होती. या आध्यात्मिक चळवळीने फक्त अमेरिकेतच नाही तर अनेक देशांमध्ये आपले बळकट स्थान निर्माण केले आहे. या संस्थेकडे जगभर आदराने पाहिले जाते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस हे इस्कॉनचे पूर्ण नाव आहे. श्रील प्रभुपाद स्वामी अर्थात अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी या आध्यात्मिक चळवळीची मुहुर्तमेढ रोवली होती. कोलकात्यात जन्मलेले प्रभुपाद स्वामी हातात 40 रुपये आणि भगवान कृष्णाची काही पुस्तके घेऊन अमेरिकेतील बोस्टनला पोहोचले होते. त्यांनी तिथे वेळ मिळेल तेव्हा कृष्णाची प्रवचने उद्यानांमध्ये सांगण्यास सुरुवात केली. तरुण याकडे आकर्षित व्हायला लागले आणि तिथूनच या इस्कॉनची सुरूवात झाली होती. सुरुवातीला याचे नाव लॉर्ड कृष्ण मूव्हमेंट असे ठेवण्यात आले होते.

Advertisement
1966 साली प्रभुपाद स्वामी न्यू यॉर्कमध्ये स्थायिक झाले. तिथे त्यांनी दर आठवड्याला प्रवचन घेण्यास सुरुवात केली आणि याच वर्षी इस्कॉनची स्थापना झाली.

पुढच्या 2 वर्षांत न्यू मेक्सिको, लॉस एंजलिस, सिएटल, सॅन फ्रॅन्सिस्को, सांता फे आणि माँट्रीआल इथे इस्कॉन मंदिरे स्थापन करण्यात आली.  सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये इस्कॉनची पहिली रथ यात्रा काढण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी इस्कॉनचा रथ यात्रा हा एक मोठा सोहळा बनला आहे.

Advertisement

नक्की वाचा : 'भारत म्हणजे जमिनीचा तुकडा नाही', PM मोदी म्हणाले देश समजून घ्यायचा असेल तर....

बीटल्सच्या जॉर्ज हॅरीसन हा इस्कॉनच्या प्रेमात पडला होता. त्याने इस्कॉनला भरीव आर्थिक मदत केली ज्यामुळे इस्कॉनचा इंग्लंडमध्ये वेगाने प्रचार झाला. त्याचं 'द स्वीट लॉर्ड' हे गाणं प्रसिद्ध आहे. या गाण्यातही हरे रामा..हरे कृष्णा मंत्राचा वापर करण्यात आला आहे.  

Advertisement
अभिनेता रसेल ब्रँड हा देखील इस्कॉन संप्रदायातील असून त्याने गायिका केटी पेरीसोबत हरे कृष्ण सोहळ्यात लग्न केले होते.

अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स हे तरुण असताना इस्कॉनचा प्रसाद घेण्यासाठी अनेकदा जात असत.  स्टॅनफोर्ड विद्यापीठात एका लेक्चरमध्ये त्यांनी सांगितले की तरूण असताना माझ्याकडे राहण्यासाठी घर नव्हतं त्यामुळे मी मित्राच्या घरी झोपायचो. रविवारी चांगलं जेवण इस्कॉनच्या महाप्रसादामध्ये मिळायचं, त्यासाठी मी 7 मैल (अंदाजे 11 किमी )अंतर चालत जायचो. प्रभुपाद स्वामी यांनी न्यू यॉर्कमधी अतिश्रीमंत राहात असलेल्या भागात राहण्याऐवजी गरीब, गुंड, व्यसने करणाऱ्यांच्या वसाहतीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. तिथल्या लोकांना सुधारण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. प्रभुपाद स्वामींच्या या निस्वार्थ वृत्तीमुळे प्रसिद्ध कवी अॅलन गिन्सबर्ग हे भक्त झाले होते. 

नक्की वाचा : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ

संपूर्ण जगात आजच्या घडीला 400 हून अधिक मंदिरे, 40 ग्रामीण समुदाय आणि 100 हून अधिक भोजनालये आहेत. मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात निशुल्क खिचडीचा प्रसाद दिला जातो. गिरगाव चौपाटीवरील इस्कॉन मंदिरातही ठरावित वेळेत निशुल्क प्रसाद दिला जातो.