NPS Vatsalya : आता मुलांच्या पेन्शनचीही झाली सोय, काय आहे केंद्र सरकारची नवी योजना?

NPS Vatsalya Scheme : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी (18 सप्टेंबर) रोजी ‘एनपीएस वात्सल्य' योजना सुरु केली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
N
मुंबई:

NPS Vatsalya Scheme : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी (18 सप्टेंबर) रोजी ‘एनपीएस वात्सल्य' योजना सुरु केली आहे. मुलांच्या भविष्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करण्यात आली होती. या योजनेमुळे मुलांच्या पेन्शनचा प्रश्न सुटणार आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे योजना?

एनपीएस वात्सल्य योजना सध्याच्या नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System) म्हणजेच एनपीएसकडून (NPS) डिझाईन करण्यात आली आहे. या योजनेनुसार आई-वडिल किंवा पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी खातं सुरु करु शकतात. त्यांच्या रिटायरमेंट फंडमध्ये योगदान करु शकतात. 

आई-वडिल मुलांच्या एनपीएस खात्यामध्ये वर्षभरात किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करु शकतात. महत्त्वाच्या बँका, पोस्ट ऑफिस, नॅशनल पेन्शन फंड तसंच e-NPS च्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी खातं उघडू शकता.

ही रक्कम मुलांच्या निवृत्तीच्यावेळी  (Retirement Planning) कामाला येणार आहे. अल्पवयीन मुलांना पर्मनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर (PRAN) दिले जाईल. मुलं सज्ञान झाल्यानंतर या योजनेला सामान्य एनपीएस खात्यामध्ये बदललं जाईल. 18 वर्षांनंतर मुलं ते खातं स्वत: सांभाळू शकतात. 

( नक्की वाचा : Lakhpati Didi Scheme : महिलांचं भाग्य बदलणारी 'लखपती दीदी' योजना काय आहे? कसा करणार अर्ज? )
 

किती वर्ष करावी लागेल गुंतवणूक?

या योजनेसाठी 3 वर्ष लॉक-इन कालावधी आहे. तीन वर्षांनंतर शिक्षण, गंभीर आजारपण आणि अपंगत्व यासारख्या महत्त्वांच्या कारणांसाठी खात्यामधील 25 टक्के रक्कम काढता येईल. हे जास्तीत जास्त तीन वेळा करता येईल. 

योजनेचे प्रमुख फायदे काय?

- या योजनेमुळे पालकांना मुलांच्या पेन्शनसाठी गुंतवणूक त्यांच्या लहाणपणापासूनच करण्यात येऊ शकते
- दीर्घ काळ गुंतवणूक केल्यानं त्याचा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
- या योजनेतील गुंतवणुकीमुळे करामध्येही सवलत मिळेल
- योजनेतील रक्कम आणि अवधी निवडण्याची पद्धत लवचिक आहे. तुम्ही ती तुमच्या सोयीनुसार निवडू शकता
- मुलांच्या नावावं खातं असल्यानं त्यांना याबाबतचा निर्णय घेणं सोपं आहे.