Who is Aviva Baig : फोटोग्राफर, राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉलर; प्रियंका गांधींची होणारी सून अविवा बेग कोण आहे?

अविवाचा जन्म एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला असला तरी तिची स्वत:ची वेगळी ओळख तिने निर्माण केली आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • प्रियंका गांधी और रॉबर्ट वाड्रा के बेटे रेहान वाड्रा ने अपनी सात साल पुरानी दोस्त अवीवा बेग से सगाई की है
  • अवीवा बेग दिल्ली से हैं और मीडिया कम्युनिकेशन एवं जर्नलिज्म में ओपी जिंदल ग्लोबल यूनिवर्सिटी से डिग्री ली है
  • अवीवा पेशेवर फोटोग्राफर हैं जिनकी तस्वीरें राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय स्तर पर पोर्टलों में प्रकाशित हो चुकी हैं
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Aviva Baig: : गांधी-नेहरु कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पसरलं आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा सुपूत्र रेहान वाड्राचा साखरपुडा पार पडला आहे. एका खासगी कार्यक्रमात हा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान वाड्राने त्याची सात वर्षे जुन्या मैत्रिणीला प्रपोज केलं आणि अविवा बेगने अत्यंत आनंदात त्याच्या प्रपोजलाचा स्वीकार केला. दोन्ही कुटुंबाच्या परवानगीनंतर हा साखरपुडा पार पडला. 

अविवा बेग कोण आहे? 

अविवा बेग दिल्लीची राहणारी आहे. तिच्या आणि वाड्रा कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. दिल्लीतील प्रतिष्ठित मॉर्डन स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केलं. यानंतर ओपी जिंदल ग्लोबल विद्यापीठातून मीडिया कम्युनिकेशन अँड जर्नालिजममध्ये पदवी मिळवली. 

अविवा आता काय करते?

अविवाचा जन्म एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला असला तरी तिची स्वत:ची वेगळी ओळख तिने निर्माण केली आहे.  


फोटोग्राफर आणि निर्माती: अविवा व्यवसायिक  फोटोग्राफर आणि प्रॉड्यूसर आहे. तिने काढलेले फोटो राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय पोर्टल आणि प्रकाशनांमध्ये  झळकले आहेत. 

आर्ट एग्जिबिशन किंवा कला प्रदर्शन: गेल्या काही वर्षात अविवाने 'यू कॅनॉट मिस दिस' (इंडिया आर्ट फेअर, 2023) आणि 'द इल्यूजरी वर्ल्ड' (2019) सारखे अनेक यशस्वी कार्यक्रमात आपली कला दाखवली आहे. 

Advertisement

सामाजिक जाणीव : अविवाचं मुख्य उद्दिष्ट तिच्या छायाचित्रांमधून सामाजिक प्रश्न उपस्थित करणं आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणं हे आहे.

फुटबॉल खिलाड़ी और प्रकृति प्रेमी

अविवा बेग हिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. ती राष्ट्रीय स्तरावर फूटबॉल खेळली आहे. निसर्गावर प्रेम असल्याने ती अनेकदा जंगलं, पर्वत, वाळवंटात कॅमेरा घेऊन फिरायला निघते. तिला प्रवास करायला आवडतो. आपल्या फोटोग्राफीच्या माध्यमातून तिने पाहिलेल्या अनेक कहाण्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. रेहान आणि अविवा बऱ्यात काळापासून एकत्र आहेत. रेहान अनेकदा आई प्रियंकासोबत राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रमात दिसतो, तर अविवा आपल्या क्रिएटिव्ह क्षेत्रात सक्रिय आहे.