Who is Tejasvi Surya Wife Sivasri Skandaprasad : भाजपाचे दक्षिण बेंगळुरुमधील खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांचं गुरुवारी (6 मार्च 2025) लग्न झालं. सूर्या यांनी कर्नाटकी गायिका शिवश्री स्कंदप्रसाद (Carnatic singer Sivasri Skandaprasad) यांच्याशी लग्न केलं. दोन्ही घरातील व्यक्ती, जवळचे मित्र तसंच मोजक्या भाजपा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न पार पडलं.
तेजस्वी सूर्या यांची फायरब्रँड भाजपा नेते अशी ओळख आहे. उच्च शिक्षित राजकारणी आणि कुशल वादविवादपटू असलेले सूर्या तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या पत्नीबद्दल सर्वांची उत्सुकता वाढली आहे. तेजस्वी यांच्या पत्नी शिवश्री स्कंदप्रसाद कोण आहेत? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संगीतकारांच्या घराण्यात जन्म
शिवश्री स्कंदप्रसाद यांचा जन्म 1 ऑगस्ट 1996 रोजी झाला. त्या मृदंगम वादक सीरकादी जे स्कंदप्रसाद यांच्या कन्या आहेत. त्यांचे आजोबा सीरकाजी आर. जयरामन एक दिग्गज संगीतकार होते. तर त्यांच्या आजी शांती जयरामन या भरतनाट्यममधील प्रमुख कलाकारांसाठी लोकप्रियक गायक आणि संगीतकार होत्या.
शिवश्री यांनी तंजावरच्या शस्त्र विद्यापीठातून (SASTRA University) बायो इंजिनिअरिंगमधून बीटेक आणि त्यानंतर मद्रास विद्यापाठीतून भरतनाट्यममध्ये एमए केलं आहे. त्यांनी कौटुंबिक परंपरेनुसार तिसऱ्या वर्षापासून भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. त्यांनी एकट्यानं अनेक कार्यक्रम देखील सादर केले आहेत.
( नक्की वाचा : 'राजीव गांधी दोनदा नापास झाले होते,' मणिशंकर अय्यर यांनी सांगितला काँग्रेसला टोचणारा किस्सा )
शिवश्री यांचा अनेक प्रतिष्ठित संगीत पुरस्कारानं गौरव झाला आहे. त्यामध्ये भारत कला चुडामणी, युवा सन्माम पुरस्कार आणि भजन भूषण पुरस्कार या प्रमुख पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी एआर रेहमान यांनी संगीत दिलेल्या पेन्नियन सेलवन या चित्रपटामध्ये एक गाणं देखील गायलं आहे. YouTube तसंच अन्य म्युझिक प्लॅटफॉर्मवरही त्यांचे गाणे प्रकाशित झाले आहेत.