International Yoga Day 21 जून हा जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगासनामुळे फक्त तब्येत चांगली राहत नाही तर मनही शांत होतं. आपल्या देशात बाबा रामदेव यांच्यासारखे अनेक दिग्गज योग गुरु आहेत. त्यांनी जगभर योगासनांना नवी ओळख दिलीय. पण, योगाचा उल्लेख स्वामी शिवानंद यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. स्वामी शिवानंद यांनी वयाच्या मर्यादा तोडून योगाचं महत्त्व संपूर्ण जगाला समजावलंय. त्यामुळेच 127 व्या वर्षी देखील योगासनांना त्यांच्या आयुष्यात खास महत्त्व आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत स्वामी शिवानंद?
वारणासीच्या स्वामी शिवानंद यांना योगगुरु म्हणूनही ओळखलं जातं. स्वामी शिवानंद त्यांच्या दीर्घायुष्याचं श्रेय योगासनांना देतात. त्यांच्या दिनचर्चेत योगाचं खास स्थान आहे. योग, प्राणायाम आणि घरगुती उपचार हा निरोगी राहण्याचा मूलमंत्र आहे, असं ते सांगतात. ते रोज पहाटे 3 वाजता उठतात आणि योगासनं करतात. मुळचे बंगलाचे असलेले स्वामी शिवानंद बनारसमध्ये आले. त्यांनी गुरु ओंकारनंद यांच्याकडून शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी योगासनामध्ये प्रावीण्य मिळवलं. योगासनाचं शिक्षण झाल्यानंतर गुरुंच्या आदेशानुसार 34 वर्ष जगभरातील अनेक देशांचा दौरा केला.
स्वामी शिवानंद यांनी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, रशियासह अनेक युरोपीयन देशांचा दौरा केला आहे. ते अगदी साधं आयुष्य जगतात. त्यांची धर्मावर मोठी श्रद्धा आहे. आपलं वय 125 वर्षांपेक्षा जास्त आहे, असा त्यांचा दावा आहे. आधार कार्डनुसार त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1896 रोजी फाळणीपूर्वीच्या पूर्व बंगालमध्ये झाला. कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या साथीमध्ये शिवानंद पूर्णपणे फिट होते. त्यांनी याचं श्रेय खाण्याच्या सवयी आणि योगासनांना दिलं.
ट्रेंडींग बातमी - महिलांनो, नेहमी फिट राहण्यासाठी रोज करा ही 4 योगासनं
पद्मश्रीनं सन्मान
योगासनातील उत्कृष्ठ कार्यासाठी स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. 2019 साली त्यांचा बेंगळुरुमध्ये योग रत्न पुरस्कारानंही सन्मान करण्यात आलेला आहे. योग आणि संयमी दिनचर्या यांच्या मदतीनं त्यांनी शंभरीनंतरही स्वत:ला निरोगी ठेवलंय. ते सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यामुळेच योगासनाबाबतचं त्यांचं समर्पण हे दुसऱ्यांपेक्षा वेगळं उठून दिसतं. ज्या वयात लोकांना चालणही शक्य नाही त्या वयात स्वामी शिवानंद नियमित योगासनं करतात.
पंतप्रधान मोदीही फॅन
स्वामी शिवानंद यांना पद्म पुरस्कारानं (Padma Award) गौरवण्यात आलं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांच्यापुढं नतमस्तक झाले होते. स्वामी शिवानंद हा सन्मान घेण्यासाठी उभे राहिले त्यावेळी संपूर्ण दरबार हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. पंतप्रधान मोदी देखील त्यावेळा उपस्थित होते. त्यावेळी पंतप्रधानांनी खाली वाकून त्यांना अभिवादन केलं. स्वामी शिवानंद यांनी अनवाणी राष्ट्रपतींकडून पद्ध पुरस्कार स्विकारला. त्यानंतर त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा झाली.