भारतीय रेल्वेच्या सीट नेहमी निळ्या रंगाच्याच का असतात? कारण जाणून म्हणाल, रेल्वेने तर डोकं लावलं

रेल्वेच्या या एका निर्णयामुळे प्रवाशांना सुविधा आणि रेल्वेला कमी खर्चात उत्तम व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Why Train Seats Blue: भारतीय रेल्वेने दररोज करोडो नागरिक प्रवास करतात. लांब पल्ल्याची एक्सप्रेस असो वा लोकल ट्रेन, सर्वांमध्ये एक गोष्ट सारखीच असते, ती म्हणजे 'सीट्सचा निळा रंग'. रेल्वेने सीट्ससाठी निळाच रंग का निवडला? यामागे केवळ डिझाईन नसून एक मोठे वैज्ञानिक आणि व्यावहारिक कारण दडले आहे. त्यामागचे कारण जर तुम्ही जाणून घेतलं तर म्हणाल रेल्वेने खरोखर डोकं लावलं आहे. 

मानसशास्त्राच्या (Psychology) मते, निळा रंग हा मानसिक शांतता देणारा आणि ताणतणाव कमी करणारा मानला जातो. रेल्वेचा प्रवास अनेकदा तासनतास किंवा काही दिवसांचा असतो. अशा वेळी जर सीट्सचा रंग जास्त भडक असेल, तर प्रवाशांना अस्वस्थता जाणवू शकते. निळा रंग डोळ्यांना सुखावतो आणि प्रवाशांना रिलॅक्स ठेवण्यास मदत करतो. या गोष्टी लक्षात घेवून भारतीय रेल्वेमध्ये सीटचा रंग हा बहुदा निळाच असतो. 

Advertisement

भारतीय ट्रेन्समध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे सीट्सवर धूळ, माती आणि डाग पडणे सामान्य आहे. जर सीट्सचा रंग पांढरा किंवा फिकट असता, तर त्या खूप लवकर अस्वच्छ दिसल्या असत्या. निळा रंग असेल तर त्यावर घाण साचत नाही. किंवा डाग बऱ्याच अंशी लपवून ठेवले जातात. ज्यामुळे कोच दीर्घकाळ स्वच्छ दिसतात. त्यामुळे निळा रंग वापरण्या मागे स्वच्छता हा एक फॅक्टर महत्वाचा मानला जातो. 

भारतातील विविध राज्यांमध्ये कडक ऊन आणि उष्णता असते. फिकट रंग उन्हामुळे लवकर खराब किंवा फिके होतात. याउलट, निळा रंग दीर्घकाळ टिकतो आणि त्याची चमक कमी होत नाही. त्यामुळे रेल्वेसाठी हा रंग कमी देखभालीचा (Low Maintenance) आणि फायदेशीर ठरतो. केवळ भारतीय रेल्वेच नाही, तर जगातील अनेक नामांकित एअरलाईन्स आणि सार्वजनिक वाहतुकीतही निळ्या रंगाचा वापर प्राधान्याने केला जातो.