Two wheeler Toll: दुचाकीला टोल का द्यावा लागत नाही? 99 टक्के लोकांना कारणच माहित नाही

टू व्हीलरला टोल का माफ केला जातो हे अनेक लोकांनाच माहित नव्हते.

जाहिरात
Read Time: 3 mins

आपण कुठे ही रस्त्याने प्रवास करायचा झाली की टोल हा आलाच. प्रत्येक ठिकाणी टोल भरा आणि पुढे जा हे आता नियमित झालं आहे. कार असेल, बस असेल किंवा अवजड वाहन असेल टोल भरणे हे प्रत्येकालाच बंधनकारक आहे. पण कधी तुम्ही टू व्हिलर म्हणजेच दुचाकीवाल्यांना टोल भरताना पाहीलं आहे का? नाही ना. पण त्यांना टोल का माफ असतो याचा कधी विचार केला आहे का? अनेक जणांना म्हणजेच 99 टक्के लोकांना तर टू व्हिलरकडून टोल का घेतला जात नाही हेच माहित नाही. दुचाकीचा टोल घेतला जात नाही या मागे केवळ एकच नव्हे, तर अनेक ठोस कारणे आहेत. ही सूट केवळ सोयीसाठी नाही, तर ती एका सुनियोजित धोरणाचा भाग आहे.

याचे पहिले कारण म्हणजे ट्रक हा जवळपास 16 ते 40 टनाचा असतो. बसच्या तुलनेत दुचाकी फक्त 100-200 किलो वजनाची असते.  त्यामुळे टू व्हिलर  रस्त्यावर धावतांना त्याने रस्त्याचे  नगण्य नुकसान होते. त्यांचे वजन कमी असल्याने, त्यांच्याकडून टोल घेणे हे रस्त्याच्या देखभालीच्या खर्चाच्या तुलनेत आवश्यक वाटत नाही असं सरकारचं धोरण आहे. भारतात 7 कोटींहून अधिक दुचाकी आहेत. ज्यात बहुसंख्य मध्यम आणि निम्न उत्पन्न गटातील लोक आहेत. जर प्रत्येकावर दररोज ₹30-50 चा टोल लादला गेला, तर त्यांच्यावर दररोज मोठा अतिरिक्त आर्थिक भार पडेल. जो सामाजिक न्याय आणि समानतेच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. त्यामुळे टोल घेतला जात नाही. 

नक्की वाचा - Dombivli News: आता डोंबिवलीत ही! महिला 1 पण वोटर आयडी 2, नाव-पत्ता सेम, फक्त फोटो वेगळा

एका मोठ्या टोल प्लाझावरून दररोज 25,000 हून अधिक दुचाकी जातात. जर प्रत्येक दुचाकीला टोलसाठी थांबवले, तर 15-20 मिनिटांच्या लांब रांगा लागतील. त्यामुळे संपूर्ण महामार्ग हा ठप्प होईल. शिवाय, त्यांच्याकडून टोल वसूल करण्यासाठी लागणारा कर्मचाऱ्यांचा, लेन्सचा आणि यंत्रसामुग्रीचा खर्च मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  दुचाकी खरेदी करताना ग्राहक 15 वर्षांसाठी एकरकमी रोड टॅक्स भरतात. तो जवळपास पाच ते पंधरा हजार असतो. हा कर रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडे जमा होतो. म्हणजेच, दुचाकी चालक अप्रत्यक्षपणे या खर्चात आधीच योगदान देतात.

नक्की वाचा - Jemimah Rodrigues: मासिक पाळीच्या वेळी काय करता? जेमिमा रॉड्रिग्जनं दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही म्हणाल, अरे बापरे

भारतीय राष्ट्रीय महामार्ग शुल्क अधिनयमात मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, मोटारसायकल, स्कूटर, मोपेड यांसारख्या दुचाकी व तीनचाकी वाहनांना टोल प्लाझावरून पूर्णपणे सूट आहे. NHAI ने 2024 मध्ये स्पष्ट केले आहे की, 2030 पर्यंतही ही सूट कायम राहणार आहे. त्यामुळे 2030 पर्यंत टू व्हिलर या टोलमुक्त असतील. दरम्यान टू व्हीलरला टोल का माफ केला जातो हे अनेक लोकांनाच माहित नव्हते. मात्र यानंतर आता अनेकांना ही माहिती समजली असेल. 

Advertisement