धक्कादायक : यूट्यूबर जोडप्यानं सातव्या मजल्यावरुन मारली उडी!

जाहिरात
Read Time: 1 min
या जोडप्यामध्ये रात्री उशीरा जोरदार वाद झाला. (फाईल फोटो)
मुंबई:

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुण यूट्यूबर जोडप्यानं सातव्या मजल्यावरुन उडी मारुन जीव दिला आहे. हरियाणामधील बहादूरगडमध्ये हा प्रकार घडला आहे. हे शहर राजधानी दिल्लीपासून फक्त 20 किलोमीटर दूर आहे. या दोघांमध्ये जोरदार वाद झाल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  

गर्वित (वय 25) आणि नंदिनी (वय 22) अशी या दोघांची नावं आहेत. ते कंटेट क्रिएटर होते. तसंच स्वत:चं  चॅनल चालवत होते. त्याचबरोबर यूट्यूब आणि फेसबुकवर शॉर्ट फिल्मही बनवत असतं. हे दोघं काही दिवसांपूर्वीच त्यांच्या टीमसह डेहराडूनहून बहादूरगडला पोहोचले होते. त्यांनी येथील एका खासगी अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर फ्लॅट किरायानं घेतला होते. त्या फ्लॅटमध्ये ते पाच सहकाऱ्यांसह राहात होते. 

Advertisement

नवजात अर्भकांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, लाखो रुपयांत व्हायचा सौदा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी आज सकाळी 6 वाजता आत्महत्या केली. ते रात्री उशीरा शूटिंगहून परतले होते. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. या जोडप्यानं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल का उचललं? याचा पोलीस तपास करत आहेत. 

Topics mentioned in this article