Viral Puzzle: घरात आहेत 4 लोक, 1 बहिरा, 1 मुका, 1 आंधळा, 1 लंगडा, लाईट गेल्यावर सर्वात आधी मेणबत्ती कोण लावेल?

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. पण नुकतंच समोर आलेल्या एका पझलने अनेकांना चक्रावून टाकलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Viral Puzzle IQ Test

Viral Puzzle : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. पण नुकतंच समोर आलेल्या एका पझलने अनेकांना चक्रावून टाकलं आहे. हे व्हायरल पझल पाहून तुम्हालाही‘शिवाजी: द बॉस' या चित्रपटातील तो प्रसिद्ध डायलॉग नक्कीच आठवला असेल. आता पझल काय आहे आणि प्रश्नासोबत कोणते ऑप्शन्स दिले आहेत,हे तर तुम्ही आर्टिकलच्या हेडिंगमध्येच वाचले असेल. मग आता मेंदुला चालना देण्याची वेळ आली आहे.

जो कोणी या पझलचं अचूक उत्तर देईल,त्या व्यक्तीकडे नक्कीच तल्लख बुद्धी असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे पझल सोडवताना तुमचा आयक्यू (IQ) लेव्हलही तपासला जाणार आहे. तसच तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनही बदलणार आहे. आजच्या या व्हायरल पझलमध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, याच ऑप्शनमध्ये या पझलचं अचूक उत्तर लपलं आहे.

बहिरा,मुका, आंधळा आणि लंगडा, लाईट गेल्यावर सर्वात आधी मेणबत्ती कोण पेटवेल?

1. बहिरा

2. मुका

3. लंगडा

4. आंधळा

जर तुम्ही हा प्रश्न नीट वाचला असेल, तर तुमच्या मनात एक विचार नक्की आला असेल, माचिसच्या सर्वात जवळ जो व्यक्ती असेल, तोच पहिल्यांदा मेणबत्ती पेटवू शकेल. पण लॉजिकली पाहिलं तर,लोकांना दिलेले चारही पर्याय चुकीचे ठरू शकतात.कारण लाईट गेल्यानंतर जो अंधार होईल, तो सर्वांसाठी एकसारखाच असेल. त्यामुळेच हा प्रश्न एकप्रकारच्या ट्रिकसारखाच वाटतो. या प्रश्नात सर्वात आधी एलिमिनेट होणारा पर्याय ‘ऑप्शन 4 आंधळा' आहे. कारण त्याला आधीपासून काही दिसत नाही. त्याच्याकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. तर दुसरीकडे,जो व्यक्ती मुका किंवा बहिरा आहे,त्याच्यामध्ये संवाद (कम्युनिकेशन) साधण्यात थोडा उशीर होऊ शकतो.

योग्य पर्याय कोणता?

लंगड्या व्यक्तीला जरी चालता येत नसलं,तरी त्याचे हात व्यवस्थित काम करतात. म्हणजेच तो चालू शकत नसेल,पण मेणबत्ती पेटवण्यासाठी त्याला हाताचा वापर करण्यात अडथळा येणार नाही. 

Advertisement