वारंवार हेअर डाय केल्याने होतात हे 6 तोटे, पैसे वाया जातात शिवाय केसांचे होते मोठे नुकसान

Hair Dye Disadvantages: हेअर डायचा वापर आजकाल खूप सामान्य झाला आहे. केसांचा रंग बदलण्यासाठी लोक वारंवार हेअर डाय करताना दिसतात, मात्र सातत्याने डाय करणे हे केसांसाठी दोकादायक ठरू शकते. जाणून घेऊया केसांना वारंवार रंग लावण्याचे तोटे काय आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

आजकाल आकर्षक दिसण्यासाठी अनेकजण केस डाय करतात. काहींना स्टायलिश दिसायचं असतं तर काहींना आपले पांढरे केस लपवायचे असतात म्हणून ते डाय करतात. अकाली पांढरे केस दिसू लागल्याने अनेकांना आपण म्हातारे झाल्यासारखं वाटतं, त्यावर उपाय म्हणून केसांना रंग लावणे हा उपाय असतो. काळ्या रंगासोबत हल्ली बाजारमध्ये विविध रंगांचे डाय मिळतात. त्याचा अनेकजण सर्रासपणे वापर करतात. केस रंगवल्याने ती व्यक्ती छान, आकर्षक दिसते. अनेक महिला आपल्या लांबसडक केसांची निगा राखण्यासाठी विविधं तेलांचा आणि डायचा वापर करताना दिसतात. मात्र सतत डाय करणे हे केसांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं.  वारंवार हेअर डाय करण्याचे तोटे काय आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


डाय करण्याचे तोटे | Harmful Effects of Hair Dyeing
1. केस कमकुवत होऊ लागतात

हेअर डाय हा विविध रसायने वापरून बनवलेला असतो. या रसायनांमुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा नष्ट होतो ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. हेअर डाय वारंवार लावल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, त्यामुळे केस लवकर तुटू लागतात.


2. टाळूच्या समस्या

हेअर डायमधील रसायने टाळूचे नुकसान करू शकतात. यामुळे खाज, जळजळ आणि लालसरपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. काही लोकांना स्कॅल्प ऍलर्जी देखील असू शकते, ज्यामुळे एक्झिमा किंवा डर्माटायटीससारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

3. केस गळणे

वारंवार हेअर डाय लावल्याने केसांच्या मुळांवर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे केसगळती वाढते. रसायनांचा जास्त वापर केल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, ज्यामुळे केसांची वाढ थांबते.

Advertisement

4. केसांचा रंग फिकट होणे

हेअर डायच्या वारंवार वापरामुळे केसांचा नैसर्गिक रंग निघून जातो. यामुळे केसांचा रंग बदलतो आणि निस्तेज होऊ शकतो. वारंवार डाय केल्याने बदलल्याने त्यांच्या टेक्श्चरवरही वाईट परिणाम होतो.

5. कर्करोगाचा धोका

काही रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की केसांसाठीच्या डायमध्ये असणाऱ्या रसायनांमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.यासंदर्भात अधिक संशोधन सुरू असून याबाबत वापरकर्त्यांनी थोडं जागरूक राहणे गरजेचे आहे. 

Advertisement

6. वेळ आणि पैशाचा अपव्यय

केसांना पुन्हा पुन्हा रंग लावण्यात बराच वेळ आणि पैसा वाया जातो. प्रत्येक वेळी तुम्ही हेअर डाय विकत घेता  किंवा सलूनमध्ये जाऊन डाय लावता तेव्हा त्यासाठी खर्च करावा लागतो. डाय करणं ही ठराविक काळानंतर सतत करावी लागणारी प्रक्रिया असल्याने यासाठी वेळही वाया जातो आणि पैसेही.

हेअर डायमुळे केसांचे नुकसान होते आणि टाळूलाही त्वचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे हेअर डाय वापरताना काळजी घ्यावी आणि नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घ्यावी. जर तुम्हाला केसांचा रंग वापरायचा असेल तर तो मर्यादित प्रमाणात आणि सुरक्षित पद्धतीने वापरा, जेणेकरून केसांचे आणि टाळूचे कमीत कमी नुकसान होईल.

Advertisement

 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)