AC Cleaning At Home: मे आणि जून महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर अनेक घरात एसीचा (Air conditioner) वापर वाढतो. वाढत्या उन्हात घर थंड होण्यासाठी, शांत झोप लागावी म्हणून एसीचा वापर होतो. उन्हाळ्याच्या सिझनमध्येही एसीचं सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे. योग्य पद्धतीनं सर्व्हिसिंग केलं नाही तर एसीचं कुलिंग कमी होतं. एसीचं कुलिंग चांगलं राहावं यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आम्ही देत आहोत. विशेष म्हणजे ते तुम्ही घरच्या घरी कोणत्याही टेक्निशियनच्या मदतीशिवाय करु शकता. त्यामुळे तुमच्या पैशांमध्येही बचत होईल.
तुम्ही घरात एसी वापरत असाल तर धूळ आणि मातीमुळे त्याच्या फिल्टरची जाळी ब्लॉक होते. त्यामुळे तो पूर्णपणे थंड होत नाही. त्यामुळे कुलिंगही कमी होऊ लागतं. ही गोष्ट टाळण्यासाठी वेळोवेळी एसी फिल्टर साफ करणे आवश्यक आहे.
( नक्की वाचा : 13 वर्षांनंतर ICMR कडून भारतीयांसाठी नवी नियमावली, चुकीच्या आहारामुळे 56% आजार; काय टाळाल? )
'या' पद्धतीनं करा एसीची स्वच्छता
तुम्हाला तुमच्या घरातील एसी थंड करण्यासाठी त्याचे फिल्टर वेळोवेळी साफ करणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी एसीचा प्लॅप ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला दोन फिल्टर दिसतील. हे फिल्टर बाहेर काढा. ते झाडून त्यावरील धूळ स्वच्छ करा. त्यानंतर एका ब्रशच्या मदतीनं त्यामध्ये जमा झालेली सर्व घाण काढा आणि पाण्यानं स्वच्छ करा. फिल्टर वाळल्यानंतर तो पुन्हा एसीमध्ये लावा.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
किती दिवसांमध्ये करावी स्वच्छता?
एसी फिल्टर 4 ते 6 आठवड्यांमध्ये स्वच्छ केला पाहिजे. तुम्ही स्पिल्ट आणि विंडो दोन्ही प्रकारच्या एसीची स्वच्छता करु शकता. तुम्ही वेळोवेळी एसी फिल्टरची स्वच्छता केली नाही तर त्याच्या कंप्रेसरवर लोड येतो. त्यामुळे एसी लवकर खराब होऊ शकतो.