Rare Interstellar Comet Details: आकाशात घडणाऱ्या घटना इतक्या दुर्मिळ असतात की, त्यांना पाहण्याची संधी जीवनात फक्त एकदाच मिळते. आता असाच एक खास क्षण पाहता येणार आहे. जेव्हा एक इंटरस्टेलर धूमकेतू आकाशात चमकताना दिसणार आहे. हा योग फक्त खगोल शास्ज्ञज्ञांसाठीच खास नाही,तर सामान्य माणसांसाठीही मोठी पर्वणीच आहे.
एक खूप दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे. ज्यामध्ये C/2025 R3 (Pan-STARRS) नावाचं इंटरस्टेलर धूमकेतू आकाशात दिसणार आहे. या धूमकेतूला पहिल्यांदा 7 सप्टेंबर 2025 रोजी Pan-STARS कडून Haleakala मध्ये शोधण्यात आलं होतं.
1.7 वर्षात एकदाच मिळते संधी
न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,हा धूमकेतू सर्याला जवळपास 170000 वर्षात प्रदक्षिणा घालतो. याला शेवटचं तेव्हा पाहिलं गेलं होतं, जेव्हा पृथ्वीवर अश्मयुग होतं.
नक्की वाचा >> Chandrapur News: भाजप प्रदेशाध्यक्षांच्या पत्राचा काँग्रेसला फायदा, सत्ताधारी भाजपला धक्का, मनपात उलथापालथ
केव्हा आणि कसं पाहाल?
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार,या धुमकेतूला पाहण्याची सर्वात चांगली वेळ 10 एप्रिल ते 20 एप्रिल च्या मध्ये आहे. या दरम्यान हळूहळू जास्त चमकदार होईल.
19 एप्रिल : हे सूर्याच्या सर्वात जवळ (Perihelion) होईल.
27 एप्रिल : हे सूर्याच्या सर्वात जवळ असेल आणि सर्वात जास्त चमकेल.पण त्यावेळी उत्तरी गोलार्धात दिसणार नाही.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात जाणाऱ्या पर्यटकांना अलर्ट करणारी बातमी! सिंहगड किल्ल्यावर घडली हादरंवून टाकणारी घटना
पाहण्याची योग्य पद्धत
निक जेम्स यांच्या माहितीनुसार, हे पाहण्यासाठी सकाळी सूर्योदयाच्या 1-2 तास आधी उठावं लागेल. पूर्व दिशेला आकाश पाहा. शहराच्या प्रकाशापासून दूर राहा. अंधारात आणि मोकळ्या जागेवर जा. हा धूमकेतू आता Pegasus आकाशगंगेत उपलब्ध आहे आणि तो 'ग्रेट स्क्वायर ऑफ पेगासस'जवळून जात आहे.
कसं ओळखणार धूमकेतू?
धूमकेतूला ओळखण्यासाठी त्याची हलकी धूसर चमक (COMA) वर लक्ष द्या. जसं जसं ते सूर्याच्या जवळ जाईल. त्याचा छोटा शेपटीसारखा आकारही दिसेल. पण हे उघड्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. पण 10x50 च्या दुर्बिनने स्पष्ट पाहता येईल.