AI Impact on Jobs: नोकऱ्यांवर 'एआय'चे संकट? रिपोर्ट्सनुसार 'या' क्षेत्रात 25% नोकऱ्या धोक्यात

Goldman Sachs अहवालात दिलासादायक बाब ही आहे की, कोणताही जॉब सेक्टर पूर्णपणे नष्ट होणार नाही. रोजगार कमी होऊ शकतात, पण ते संपणार नाहीत.

जाहिरात
Read Time: 2 mins

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) मुळे नोकऱ्यांमध्ये होणारे बदल आणि त्याचे संभाव्य परिणाम यावर 'गोल्डमन सॅक्स' (Goldman Sachs) च्या अहवालाने प्रकाश टाकला आहे. तांत्रिक प्रगतीमुळे उत्पादकता वाढणार असली, तरी अनेक पारंपारिक नोकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे आगामी काळात 25% नोकऱ्या ऑटोमेशनच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. क्लर्क, कोडिंग आणि डेटा ॲनालिसिस यांसारख्या व्हाईट कॉलर नोकऱ्यांवर याचा सर्वाधिक परिणाम होणार असून, यामुळे कंपन्यांच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. 'गोल्डमन सॅक्स'च्या नव्या अहवालानुसार, एआय एकीकडे उत्पादकता वाढवणार असले, तरी दुसरीकडे अनेक क्षेत्रांतील मनुष्यबळाची गरज कमी करणार आहे.

कोणत्या नोकऱ्यांवर होणार सर्वाधिक परिणाम?

  • डेटा ॲनालिसिस: माहितीचे विश्लेषण करणारी पदे.
  • कोडिंग आणि आयटी: सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील प्राथमिक पदे.
  • अकाउंट्स आणि लीगल: हिशोब तपासणी आणि कायदेशीर संशोधन (Legal Research).
  • क्लर्क आणि प्रशासकीय: कार्यालयीन कामकाजातील कारकुनी पदे.

'गोल्डमन सॅक्स' अहवालातील महत्त्वाचे दावे

नजीकच्या भविष्यात सध्याच्या कामांपैकी 25% हिस्सा एआयद्वारे हाताळला जाण्याची शक्यता आहे.  यूएस लेबर डिपार्टमेंटच्या डेटावर आधारित या अहवालात म्हटले आहे की, कंपन्यांना आता वेगळ्या प्रकारच्या कौशल्यांची (Skills) गरज भासणार आहे. सकारात्मक बाब अशी की, एआयच्या एकात्मिकरणामुळे जागतिक स्तरावर उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

घाबरण्याचे कारण नाही, पण सावध राहा!

अहवालात दिलासादायक बाब ही आहे की, कोणताही जॉब सेक्टर पूर्णपणे नष्ट होणार नाही. रोजगार कमी होऊ शकतात, पण ते संपणार नाहीत. उलट, ज्या लोकांकडे एआय वापरण्याचे कौशल्य असेल, त्यांच्यासाठी रोजगाराच्या नवीन आणि मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
 

Advertisement
Topics mentioned in this article