Alcohol vs Lifestyle: जास्त मद्यपान करूनही युरोपीय लोक भारतीयांपेक्षा तंदुरुस्त कसे? 'हा' आहे दोघांमधला फरक

भारतीयांमध्ये मद्यपान न करताही 'फॅटी लिव्हर'चे प्रमाण वाढते आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • युरोपीय लोकांच्या शरीरात अल्कोहल डिहायड्रोजनेज एन्झाईम्स अधिक सक्रिय असते
  • युरोपीय आहारात मासे, ऑलिव्ह ऑइल आणि कॉम्प्लेक्स कार्बोदकांचा समावेश असतो
  • भारतीय आहारात रिफाइंड कार्ब्स जास्त असल्यामुळे आणि व्यायाम कमी केल्याने लिव्हरवर दुष्परिणाम अधिक होतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

मानवी शरीर आणि मद्य यांचा संबंध अत्यंत गुंतागुंतीचा आहे. आपल्याकडे मद्यपान न करणाऱ्यांमध्येही 'फॅटी लिव्हर'ची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. तर युरोपमध्ये मद्यपान करूनही लोकांचे यकृत (Liver) सुदृढ असते. डॉ. हर्ष व्यास यांनी अलीकडेच एका इटालियन आणि एका भारतीय व्यक्तीच्या लिव्हर स्कॅनची तुलना केली. त्यात आठवड्यातून 2-3 वेळा मद्यपान करणाऱ्या इटालियन व्यक्तीचे यकृत पूर्णपणे निर्व्यसनी भारतीयापेक्षा अधिक निरोगी असल्याचे समोर आले. हे कसे शक्य झाले ते डॉक्टर व्यास यांनी सांगितले. 

यामागील तीन प्रमुख कारणे:

1. जनुकीय रचना (Genetics): 
युरोपीय लोकांच्या शरीरात 'अल्कोहल डिहायड्रोजनेज' हे एन्झाईम्स अधिक सक्रिय असतात. जे शरीरातील विषारी घटक त्वरित बाहेर फेकतात. आशियाई शरीरात हे घटक जास्त काळ टिकून राहतात.

2. आहार पद्धती: 
युरोपीय आहारात 'कॉम्प्लेक्स कार्ब्स', मासे आणि ऑलिव्ह ऑइल यांसारख्या निरोगी चरबीचा समावेश असतो. तर भारतीय आहारात रिफाइंड कार्ब्स (मैदा, साखर) जास्त असतात.

3. शारीरिक सक्रियता: 
नियमित व्यायाम आणि दररोज 5-6 किलोमीटर चालण्याची सवय युरोपीय लोकांना मद्याच्या दुष्परिणामांपासून वाचवते.

भारतीय का पिछाडीवर?
भारतीय लोक व्यायामाच्या बाबतीत आळशी आहेत. आहारात प्रथिनांऐवजी कर्बोदकांचा (साखर, मैदा) भडिमार जास्त करतात. युरोपमध्ये लोक रोज किमान 5 ते 6 किलोमीटर चालतात. त्यांच्या शरीरातील 'एन्झाईम्स' दारूला पचवण्याची ताकद राखतात. तर भारतीयांच्या शरीरात मद्याचे विषारी घटक बराच काळ रेंगाळतात. ज्यामुळे लिव्हर खराब होते. थोडक्यात, त्यांची 'लाईफस्टाईल' इतकी जबरदस्त आहे की दारूचा शरीरावर होणारा किरकोळ परिणाम शरीर स्वतःच भरून काढते.

Advertisement

नक्की वाचा - Airplane Color: विमानांचा रंग पांढराच का असतो? या मागे दडली आहेत 5 मोठी कारणे

हर्ष व्यास यांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले की, भारतीयांमध्ये मद्यपान न करताही 'फॅटी लिव्हर'चे प्रमाण वाढते आहे. तर युरोपीय लोक नियमित मद्यपान करूनही यकृताचे आरोग्य उत्तम राखतात. युरोपीय लोकांच्या शरीरातील विशिष्ट एन्झाईम्स मद्याचे रूपांतर त्वरित ऊर्जा आणि टाकाऊ पदार्थात करून ते शरीराबाहेर टाकतात. मासे, सीफूड, ऑलिव्ह ऑइल आणि हाय प्रोटीन डाएटमुळे त्यांच्या लिव्हरला संरक्षक कवच मिळते. याउलट भारतीयांच्या आहारात सकस घटकांची कमतरता असते.